शेवगाव प्रतिनिधी, दि. २२ : तालुक्यातील मुंगी येथे आषाढी एकादशीनिमित्त गोदावरी पात्रात असणाऱ्या घाटाची व श्री निलकंठेश्वर मंदिरालगतच्या परिसराची स्वच्छता करून वृक्ष लागवड करण्यात आली.
मुंगी गाव गोदावरी तिरावर असून गोदावरी खोरे विकास महामंडळामार्फत पात्रात ठीकठिकाणी बंधारे उभारून पाणी अडवले असल्याने पात्रात १२ ही महिने पाणी रहात असल्याने परिसरातील अनेक ठिकाणचे नागरिक विविध कार्यक्रम पात्रात पार पाडतात. त्यासाठी लोकसहभागातूनच पात्रात उतरण्यासाठी घाट पायऱ्याचे काम करण्यात आलेले असून पात्रातच श्री नीलकंठेश्वर मंदिर असल्याने गावातील श्री मुंगादेवी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हस्ते घाट पायऱ्या सह पात्रातील मंदिराची साफसफाई व स्वच्छता मोहीम राबऊन परिसरात वृक्षाची लागवड करण्यात आली आहे.
यावेळी माजी सरपंच राजेंद्र ढमढेरे, यादव भोंग, शिवाजी समिंदर, मिलिंद गायकवाड, बाबासाहेब तांबे, प्रदीप राजभोसले, कृषी सहाय्य्क सुभाष बारगजे, बदाम गरड, संतोष काटे, बंडू ठुबे, सयाजी कदम, भाऊसाहेब मगर, मंगेश काटे, रंगनाथ घोरपडे, बादशहा घोरपडे, या ग्रामस्थांसह मुंगादेवी विद्यालायचे प्राचार्य इकरार शेख व प्रमोद मडके आणि विद्यार्थी उपस्थित होते.