मुंढे मित्र मंडळाच्या वतीने तणनाशकाची फवारणी

शेवगाव प्रतिनिधी, दि. २३ : पावसाळ्यात पाणी साचल्याने व अनावश्यक तण उगवल्याने डासाची उत्पत्ती होवून  पसरणा-या रोगराईला आळा घालण्यासाठी तालुक्यातील सामनगाव येथे अरुण मुंढे मित्र मंडळाच्या वतीने गावठाण परिसरात तणनाशकाची फवारणी केली. यावेळी गाव स्वच्छ व सुंदर तसेच रोगराईमुक्त असण्यासाठी मित्र मंडळाच्या सदस्यांनी स्वखर्चाने फवारणी करुन श्रमदान केले.

     यावेळी सरपंच आदिनाथ कापरे, अरुण मंढे मित्र मंडळाच्या बाळासाहेब नजन, रमेश कांबळे, आदिनाथ नजन, अक्षय घुगरे, राजेंद्र कळकुंबे, शिवाजी कापरे, गौतम कांबळे, अमृत कळकुंबे, धनंजय म्हस्के, बाळासाहेब घोरपडे, माऊली काकडे, भाऊसाहेब सातपुते, रमेश नजन, भाऊसाहेब गोरे, सुभाष कोठे,सुभाष कांबळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.  यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चर्च, जगदंबा मंदिर – मस्जिद, स्मशानभुमी परिसरासह गावातील सर्व प्रभागामध्ये औषध फवारणी करण्यात आली.