उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत

शेवगाव प्रतिनिधी, दि. २३ : येथील माजी नगरसेवक सागर फडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून येथील उचल फौंडेशनच्या ऊस तोड कामगाराच्या अनाथ विद्यार्थ्यांना खंडोबा मैदानावर सुरू असलेल्या बिंगो सर्कसची स्वखर्चाने तिकिटे काढून सर्व विद्यार्थ्यांना सर्कस दाखविली.

तसेच त्यांना खाऊ वाटप करून  त्यांचा आनंद द्विगुणीत करत वेगळ्या पद्धतीने फडणवीस यांचा वाढदिवस साजरा केला.  फडके यांच्या उपक्रमाचे कौतूक होत आहे. यावेळी  फडके समवेत महेश फलके,  मिलिंद कुसळकर, संदीप जाधव, सनी क्षीरसागर,अभिजीत कबाडी, आकाश लवांडे, सागर येवले, शूभम काथवटे उचल फाउंडेशनचे सचिन खेडेकर व सागर फडके मित्र मंडळ परिवाराचे सदस्य उपस्थित होते.