सोमैया ग्रुपचे अधिकारी सतिश बोरावके यांचे निधन 

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : कोपरगाव तालुक्यातील वारी साकरवाडी  येथील सोमैया ग्रुपच्या गोदावरी बायोरिफायनरीज कंपनीचे सेवानिवृत्त अधिकारी सतिश ञिंबकराव बोरावके वय ६७ वर्षे रा. बारामती यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे उपचारा दरम्यान २० जुलै रोजी निधन झाले. 

 सतिश बोरावके हे भारतीय लष्करात वायुसेने सेनाधिकारी म्हणून देशाची सेवा केली होती. वायु सेनेत निवृत्त झाल्यानंतर त्यांनी कोपरगाव तालुक्यातील साखरवाडी येथील गोदावरी बायोरिफायनरीज या कंपनीत अधिकारी म्हणून कार्यरत होते.

सेवानिवृत्ती नंतर त्यांना अल्पशा आजाराने व्याकुळ केले त्यांना पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पाश्चात्य पत्नी मिनाक्षी बोरावके, मुलगा विवेक बोरावके, अमित बोरावके, सुन करिष्मा व नातू असा परिवार आहे. बोरावके यांच्या निधनाने बारामती व कोपरगाव तालुक्यातून शोक व्यक्त केले जात आहे.