कोपरगाव विधानसभेची निवडणुक रंगतदार होणार

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : लोकसभेच्या निवडणुकी नंतर आता विधानसभेची निवडणूक येत्या काळात होणार असून कोपरगाव शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती मा.तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेची निवडणूक अतिशय रंगतदार होणार असल्याचे दिसत आहे. काल बाहुबली पतसंस्थेत शिवसेना  पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.

कोपरगाव विधानसभेची जागा ही शिवसेनेलाच मिळावी अशी सर्व शिवसैनिकांची इच्छा असून त्यात काही गैरही नाही. कारण १९९० पासून विधानसभा व लोकसभा शिवसेना लढवत आहे. शिवसैनिकांच्या मोठ्या फळीमुळे अनेकदा आमदार व खासदार निवडून गेले पण प्रत्येक वेळी बाहेरून उमेदवार आयात करावा लागला.

शिवसैनिकांनी त्यांच काम इमानदारीने केले व त्यांना निवडूनही आणली परंतु पक्ष वाढीसाठी त्याचा उपयोग न होता उलट पक्षात गट बाजी निर्माण होऊन पक्ष कमकुवत झाला व निवडून आलेले उमेदवार पक्षाशी एकनिष्ठ राहिले नाही. त्याची सल सर्व शिवसैनिकांच्या मनात आजही आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसैनिकालाच उमेदवारी मिळावी अशी सर्व शिवसैनिकांची तीव्र भावाना आहे. त्या अनुषंगाने बाहुबली पतसंस्थेत झालेल्या बैठकीत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विधानसभेसाठी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला.

या आधी कोपरगाव शहरात राजेंद्र झावरे नगराध्यक्ष असतांना जी विकास कामे झाली व नगरपालिकेला जी शिस्त होती. यामुळे त्यांचे नाव शिस्तप्रिय नगराध्यक्ष म्हणून कायमच चर्चेत राहिले आहे. त्यामुळे त्यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर आहे. या संदर्भात लवकरच पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंना भेटणार असल्याचे सांगितले. शेवट पक्षप्रमुख जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य राहील असे बैठकीत ठरले. परंतु हा मतदारसंघ शिवसेनेलाच घ्यावा यासाठी सर्वांची आग्रही मागणी आहे. असे असले तरी शिवसेना पुन्हा उमेदवार आयात करते की शिवसैनिकाला उमेदवारी देते हे बघावा लागेल.

या बैठकीस शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र झावरे, उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, प्रमोद लबडे, मा.तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे, श्रीरंग चांदगुडे, शहरप्रमुख सनी वाघ, कालु आव्हाड, भरत मोरे, असलम शेख, कलविंदरसिंग दडीयाल, अरुण बोराडे, अशोक पवार, प्रवीण शिंदे, मनोज कपोते, प्रफुल्ल शिंगाडे, रवी कथले, नितीश बोरूडे, बाळासाहेब साळुंके, राहुल देशपांडे, मुन्ना मन्सुरी, संजय दंडवते, पप्पू पडियार, रंजन जाधव, मधु पवार, गिरधर पवार, राजू शेख, आशिष निकुंभ, गगन हाडा आदी पदाधिकारी उपस्थित होते.