कोपरगांव प्रतिनिधी, दि. १ : तालुक्यातील शिंगणापुर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे मयत उसतोडणी कामगारांच्या वारसांना अमृत संजीवनी शुगरकेन लि. कंपनीने न्यु इंडिया इंशुरन्स कंपनीकडून उतरिवलेल्या गन्ना कामगार विमा अपघात पॉलिसीतुन तीन लाख रूपयांचा धनादेश संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यांत आला.
माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी कारखाना अंतर्गत ऊस उत्पादक सभासद तसेच कार्यरत यंत्रणेतील उसतोडणी वाहतुकदारासह कामगारांच्या व्यक्तीगत सुरक्षेला महत्व देत संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी न्यु इंडिया इंशुरन्स कंपनीकडुन अपघात विमा पॉलिसी उतरविली आहे.
कारखान्याचे उसतोडणी ठेकेदार ईश्वर घुमरे यांच्या टोळीतील उसतोड मजुर विलास पुंडलिक ठाकरे (कुंझर चाळीसगांव) यांचा २८ मार्च २०२३ रोजी येवला ते मातुलठाण दरम्यान मोटारसायकलचा रस्ते अपघात होवुन त्यात ते मयत झाले. कारखान्यांचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी याकामी सातत्यांने पाठपुरावा करत त्यांच्या वारस पत्नी श्रीमती सुनंदा ठाकरे यांच्याकडुन आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पुर्तता करून घेतली व न्यु इंडिया इंशुरंन्स कंपनीने त्यांचा ३ लाख रूपयांचा व्यक्तीगत अपघात विमा क्लेम मंजुर केला त्याचा धनादेश कारखाना कार्यस्थळावर श्रीमती सुनंदा ठाकरे यांना कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, अमृत संजीवनीचे लेखाधिकारी एस. सी. निकम, कारखान्याचे कामगार कल्याण अधिकारी एस. सी. चिने, हेडटाईमकिपर भास्करराव बेलोटे, केशवराव होन, ए. एच. सोनवणे आदिंच्या उपस्थितीत प्रदान करण्यांत आला.