शुक्राचार्य मंदिरात सापडले पुरातन ध्यान मंदिर

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १ : ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभलेल्या कोपरगाव बेट भागातील गुरु शुक्राचार्य मंदिराच्या गाभाऱ्यात दुरुस्ती करत असताना पुरातन काळात बांधलेले ध्यान मंदिर (गुफा) आढळून आले आहे. आतून संपूर्ण वीट बांधकाम असलेली १२ बाय १२ आकाराचे हे ध्यान मंदिर सभामंडपाच्या वरील बाजूस असल्याचे दिसून आले असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत  दिली.

मंदिरामध्ये सध्या गाभारा दुरुस्ती व सुशोभीकरणाचे काम सुरु आहे. गाभाऱ्यात वरील बाजूस तीन खिडक्या आहेत. त्यातील दोन खिडक्या या हवा येण्यासाठी आहेत तर एक खिडकी अनेक वर्षापासून बंदिस्त होती. त्याच जागेवर हे ध्यान मंदिर सापडले आहे.

सालाबाद प्रमाणे १२ ऑगस्ट रोजी आमदार आशुतोष काळे, हैद्राबाद येथील भक्त श्री शेखर यांच्या उपस्थितीत शुक्रजन्म सोहळा साजरा केला जाणार आहे. नुतनीकरण केलेल्या गाभाऱ्यात गुरु शुक्राचार्य महाराज यांच्या मकराणा मार्बल मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. १८ ऑगस्ट रोजी सकाळी गुरु शुक्राचार्य महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक, देवस्थापणा, संकल्प, मूर्तीस अभिषेक, होम हवन कुम्भात्म्क विशेष स्नान, बिलवार्चन, प्राणप्रतिष्ठा सोहळा प्रदीप राठी, युवानेते विवेक कोल्हे, मठाधिपती रमेशगिरी महाराज, परमपूज्य जंगलीदास माऊली, हभप उंडे महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.  सुशोभीकरणाचे काम सुरेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.  गुरु शुक्राचार्य महाराज मूर्ती युवानेते विवेक कोल्हे यांच्या मदतीने साकार होत असल्याचे अध्यक्ष आव्हाड व विश्वस्तांनी सांगितले.