धारणगावची विकासाची घोडदौड कौतुकास्पद – विवेक कोल्हे 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ५ : सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष, युवानेते विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत धारणगाव ग्रामपंचायतचे विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्न झाले. ग्रामीण विकासाची बळकटी देण्यासाठी ग्रामपंचायत महत्वाचा केंद्रबिंदू आहे. अनेक कामे ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था करतात त्यांना पाठबळ देणे आवश्यक आहे असे प्रतिपादन कोल्हे यांनी व्यक्त केले.

आरो फिल्टर प्लांट, गोदावरी नदीवरून गावात पाणी वापरासाठी पाईपलाईन, सौर पथदिवे आदींसह विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन पार पडले आहे. माजी आमदार  स्नेहलता कोल्हे यांच्या विधानसभा कार्यकाळात रस्ते, बस स्टँड शेड, स्मशानभूमी शेड,धारणगाव आणि चार गावची पाणी पुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी मोठे काम झाले.पाणी पुरवठा योजनेत म्हसोबा वस्ती आणि बिरोबा वस्ती भाग समाविष्ट करण्यासाठी सौ.कोल्हे यांनी महत्वाचा पाठपुरावा केला.

धारणगाव गावाने विकासाचे उत्तम काम करून दाखवले याचा आदर्श घेतला पाहिजे. मात्र मतदारसंघात याउलट परिस्थिती गत पाच वर्षात झाली आहे. विद्यमान लोकप्रतीनिधींकडून कुठेही ठोस कामे झाली नाही हे चित्र आहे. जनतेला भेडसावनाऱ्या मूलभूत समस्या सुटण्याऐवजी त्यात दिवसेंदिवस वाढ झाली हे वास्तव आहे अशी प्रतिक्रिया आमदार काळे यांच्या कारभाराबद्दल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे त्याला नागरिकांनी दुजोरा दिला.

कोल्हे गटाचे प्रतिनिधी सत्तेत असल्याने धारणगावमद्ये नागरीकांना आदर्श कारभार असल्याने कोण खरे काम करतात यावर ठाम विश्वास झाला आहे. कोल्हे परीवार हा ८०% समाजकारण आणि २०% राजकारण यावर कार्य करतो. विकासाचे धोरण घेऊन पुढे जाणारे आपल्या सारखे सहकारी यांच्यामुळे सामाजिक कार्यात ऊर्जा मिळते. प्रत्यक्षात नागरीकांना सुख सुविधा युक्त विकास अनुभवता यावा यासाठी आपण काम करतो त्याची दखल जनता घेईल आणि आशीर्वाद देईल असा विश्वास कोल्हे यांनी व्यक्त केला.

 श्रीमती नर्मदाबाई निवृत्ती देवकर या आजींनी एक गुंठा जागा धारणगाव फिल्‍टर प्‍लांटसाठी दिली आहे. त्यांची भेट घेऊन विवेक कोल्हे यांनी त्यांच्या उदार भावनेचा सन्मान केला व आशीर्वाद घेतले. अशा प्रकारे समाजासाठी काही देण्यासाठी फार मोठे दातृत्व लागते जे आपण दाखवले याचा सर्वांना अभिमान आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

याप्रसंगी ब्राम्हणगावचे माजी सरपंच बाळासाहेब बनकर, येसगावचे माजी सरपंच बापूराव सुराळकर, जेष्ठ कार्यकर्ते सोपानराव वहाडणे, सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे संचालक निवृत्ती बनकर, टीडीबीचे चेअरमन अंबादास देवकर, मा.व्हा. चेअरमनरमेश घोडेराव, दगुराव चौधरी, नानाभाऊ थोरात, सरपंच दीपक चौधरी, उपसरपंच गणेश थोरात, अप्पासाहेब थोरात, संदीप देवकर, अनुराग येवले, विजय चौधरी, विनोद सोनवणे,बाबासाहेब वाघ, दशरथ मोरे, दीपक सुरे, विलास मोरे, संतोष चौधरी, अण्णासाहेब रणशूर, नितीन थोरात, संतोष थोरात, ज्ञानदेव जगधने, सयाजी रणशूर, अश्विन वाघ, रमाकांत वाकचौरे, संदीप थोरात, भीमराव भुसे, आदींसह ग्रामपंचायत सदस्य व धारणगांव ग्रामस्थ उपस्थित होते.