सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याच्या मिल रोलरचे पुजन संपन्न

कोपरगांव प्रतिनिधी, दि १३ : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या २०२४-२५ गळीत हंगामातील मिल रोलरचे विवेक कोल्हे यांच्या हस्ते विधीवत पुजन मंगळवारी कारखाना कार्यस्थळावर पार पडले. 

प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी प्रास्तविक करतांना सांगितले की, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी सन २०२४-२५ चा गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व नियोजन पुर्ण केले असुन त्यादृष्टीने काम सुरू आहे. कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन  यावर्षीचे गाळप उद्दिष्ट पूर्ण करण्यावर व्यवस्थापनाचा भर आहे. कार्मिक अधिकारी व्ही. एम. भिसे, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

विवेक कोल्हे याप्रसंगी बोलताना म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांची प्रेरणा, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, मा.आ.सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात आपण प्रभावीपणे कामकाज करण्यासाठी सज्ज आहोत. आगामी काळात जोमाने अधिकाधिक गाळप होण्याचे लक्ष आपण ठेवले आहे. रोलर पूजन करुन येणाऱ्या हंगामासाठी कोल्हे कारखाना पूर्णपणे सज्ज आहे.

याप्रसंगी कारखान्याचे संचालक त्रंबकराव सरोदे, बाळासाहेब वक्ते, रमेश आभाळे, विश्वासराव महाले, विलासराव वाबळे, सतीश आव्हाड, राजेंद्र कोळपे, ज्ञानदेव औताडे, अप्पासाहेब दवंगे, ज्ञानेश्वर होन, निवृत्ती बनकर, संजय औताडे, विलासराव माळी, बापूसाहेब बाराहाते, डी. पी मोरे, अमोल गवळी, कामगार नेते मनोहर शिंदे, वेणूनाथ बोळीज  यांच्यासह सर्व खाते प्रमुख, उपखाते प्रमुख, विभाग प्रमुख, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी बाळासाहेब वक्ते यांनी आभार मानले.