शेवगाव प्रतिनिधी, दि. १७ : समाजासाठी बोलता व लढता यायला पाहीजे. अन्याय झाला तर रस्त्यावर उतरता यावे. जर तुम्हाला बोलता, लढता व रस्त्यावर उतरता येत नसेल तर चंद्रशेखर घुले यांच्या सारखा माणुस तुमच्यासाठी पुढे येत असेल तर त्यांच्या मागे उभं राहता आलं पाहीजे. सध्याच्या काळात आपली बाजू कोणी तरी मांडणारा पाहीजे. त्यासाठी चंद्रशेखर घुले यांच्यासारखी माणसं निवडुन आली पाहिजेत असे प्रतिपादन विठ्ठल कांगने यांनी केले.
शुक्रवारी (दि१६ ) माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या वाढदिवसानिमीत्त युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कांगने बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले होते. यावेळी माजी आमदार चंद्रशेखर घुले, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितीज घुले, दिलीपराव लांडे, अरुण पाटील लांडे, काकासाहेब नरवडे, बाळासाहेब ताठे, विजय देशमुख, नंदकुमार मुंढे, राहुल देशमुख, सचिन लांडे, अजिंक्य लांडे, माजी सैनिक विनोद शेळके, रामनाथ राजपुरे आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी कांगने म्हणाले की, एखाद्याचे स्टेसस ठेवल्याने त्याचे स्टेटस बदलत नाही. ज्याचं स्टेटस असतंय लोकं त्याचंच स्टेटस स्टेटसला ठेवतात. पहिल्यांदा स्वत:चं स्टेटस बनवायला शिका. महाराष्ट्राच्या कानकोप-यात चौकाचौकात एका महापुरुषाने ३९३ वर्षापूर्वी आपलं स्टेटस निर्माण केले. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचार आत्मसात करा. येथील तरुण सध्या पैशाच्या मागे धवतोय असे करु नका. तुमच्या गरजा कमी करा, गुण्यागोविंदाने जगा, आयाशी लोकांच्या नादी लागू नका, आपले स्वप्न इतरांच्या तुलनेत मोठे करु नका. तेव्हाच तुम्ही यशस्वी व्हाल.
यावेळी माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या हस्ते केक कपून वाढदिवस साजरा करुन शेवगाव पाथर्डी तालुक्यातील नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अभिनेत्री गायकवाड, नरेंद्र घुले, क्षितीज घुले, राजपुरे, ताठे, मुंढे, नरवडे,मंगेश थोरात, ताहेर पटेल आदींची भाषणे झाली. यावेळी आवाज जनतेचा नेता हाच आमचा या जितेंद्र भारस्कर यांनी गायीलेल्या गाण्याचा शुभारंभ प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक संजय कोळगे यांनी तर सुत्रसंचालन दिपक कुसळकर यांनी केले.
चंद्रशेखर घुले यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांची शहरातून भव्य मिरवणुक काढण्यात आली. यावेळी घुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, लोकनेते गोपीनाथ मुढे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. तर क्रांती चौकातील सिध्दीविनायक गणपती मंदिरामध्ये आरती करण्यात आली. यावेळी त्यांच्या समवेत कार्यक र्त्यांचा मोठा जमाव होता पेठेत, चौकात ठिकठिकाणी त्यांचे स्वागत झाले. क्रान्ती चौकात जेसीबीच्या साह्याने त्यांना भला मोठा पुष्प दार घालण्यात आला.