कोपरगाव मतदार संघात भाजप पक्षसंघटन मजबुत करावे – विवेक कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१८ :  पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा व त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षाला जगात पहिल्या क्रमांकावर नेऊन ठेवले आहे. राज्याच्या तळागाळातील जनतेचे प्रश्न हाताळण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज्यातील सर्व पक्ष पदाधिकारी यशस्वी होत आहे. तेव्हा नव्याने तालुकाध्यक्षपदी नियुक्ती झालेले कैलास राहणे यांनी कोपरगाव विधानसभा मतदार संघात भाजप पक्ष संघटन मजबूत करून तळागाळातील समस्या जाणून घेऊन त्याच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करावे असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले. 

तालुक्यातील बहादरपूर येथील माजी सरपंच कैलास राहणे यांची कोपरगाव तालुका भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांच्या हस्ते रविवारी सत्कार केला त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात यांनी प्रास्तविकात आगामी सर्वच निवडणुकीबाबत मार्गदर्शन करून तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केलेल्या विकासकामांची माहिती देऊन प्रलंबीत विकासकामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्य मंत्री महोदयांकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले.

विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, येथील बारमाही गोदावरी कालव्यांचा पाणीप्रश्न बिकट झालेला आहे. त्याच्या सोडवणुकीसाठी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यातच पर्जन्यमान कमी, खरीप पिके हातची गेली, रब्बी पिकांचा भरोसा नाही, कालवा सल्लागार समितीची बैठकच नसल्याने पाण्याचे आगामी धोरणही ठरले नाही. त्यातच अतितुटीच्या उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणांमधून चुकीच्या अट्टहासापायी जायकवाडीत पाणी सोडण्याचा घाट घातला जात आहे.

समन्यायी कायदा अन्याय करणारा आहे, त्याविरुद्ध रस्त्यावरच्यासह कायदेशीर लढाई सुरू आहे. भारतीय जनता पक्ष मोठा आहे. स्नेहलता कोल्हे यांनी भाजपची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत. कोरोना संकट काळात ८० कोटी भारतीयांची उपासमार होऊ नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वस्त धान्यासह कोरोना लस मोफत दिली. अजून पाच वर्षे गोर-गरीबासह सर्व भारतवासियांना मोफत अन्नधान्य देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

 बहादरपूर येथील माजी सरपंच कैलास राहणे यांची कोपरगाव तालुका भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे यांनी रविवारी सत्कार केला.

पक्ष आणि पद हे तळागाळातील उपेक्षित घटकांच्या उन्नतीचे साधन आहे. केंद्र व राज्य शासनाच्या असंख्य योजना वंचित घटकांच्या दारात नेऊन त्याच्या लाभासाठी तालुकाध्यक्ष कैलास राहणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जाणिवपूर्वक प्रयत्न करावे, सोसायटी, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा लोकसभा, यासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रत्येक निवडणुकीत भाजपा पक्ष कसा वरचढ राहिल हा हा दृष्टिकोन पदाधिकाऱ्यांनी ठेवावा. 

नवनिर्वाचीत तालुकाध्यक्ष कैलास राहणे सत्कारास उत्तर देतांना म्हणाले की, स्नेहलता कोल्हे, युवानेते विवेक कोल्हे यांनी पक्षाची दोन्ही पदे देवुन बहादरपुर व बहादराबाद वर मोठी जबाबदारी टाकाली त्या संधीचे सोने करू, दुष्काळात बिपिन कोल्हे यांनी केलेले काम व माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांची विकासाची रणनिती अधिक गतीमान करण्यासाठी प्रयत्न करू.

याप्रसंगी संजीवनी उद्योग समुहातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे सर्व आजी माजी संचालक, बाजारसमितीचे माजी उपसभापती नानासोहब गव्हाणे, प्रभाकर राहणे, कोंडाजी राहणे, सुनिल राहणे, यादव पाडेकर, दत्तात्रय खकाळे, श्रावण पाडेकर, रामनाथ जोर्वेकर, बाळासाहेब खकाळे, बबन राहणे, सुदाम राहणे, पोपट राहणे, रंगनाथ राहणे, रंगनाथ पाडेकर यांच्यासह पोहेगाव पंचक्रोशीतील असंख्य कार्यकर्ते उपस्थीत होते. शेवटी कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे यांनी आभार मानले.