ढोरा वस्ती जि. प. शाळेला साउंड सिस्टीम भेट

शेवगाव प्रतिनिधी, दि. २१ : येथील बुरुड समाजाच्या केतय्या स्वामी प्रतिष्ठानच्या वतीने जोहरापुरच्या ढोरा वस्ती वरील जिल्हा परिषद शाळेस  नुकतेच साऊंड सिस्टिम यंत्रणा भेट देण्यात आली. तर उचल फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांना फळाचे वाटप करण्यात आले.

यावेळी खासदार निलेश लंके प्रतिष्ठान व शेवगाव तालुका बुरुड समाज संचलित केतय्या स्वामी प्रतिष्ठानच्या वतीने  मिळालेल्या या ध्वनि प्रक्षेपण यंत्रणेचा प्राथमिक शाळेला अतिशय चांगला लाभ होणार असून त्याचा उपयोग विविध कार्यक्रमाचेवेळी वक्त्याची भाषणे, शाळेतील रोज होणारी प्रार्थना प्रक्षेपित करण्यास उपयुक्त ठरणार असल्याची भावना मुख्याध्यापक यांनी व्यक्त करून या स्तुत्य उपक्रमा बद्दल आभार मानले.

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष  राहुल वरे, संतोष  जगताप, हिंगणगाव चे उप-सरपंच अमोल आहेर, सोनू जगताप, सोनू वाघमारे, सुजल साठे, पोषण्णा कडमिंचे, विजय रणदिवे, देवा बोरुडे, छबु  मंडलिक, शेखर सुपारे उपस्थित होते.