कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३ : कोपरगाव शहरातील रहदारीच्या ठिकाणी एक कारने चालु स्थितीत अचानक पेट घेतल्याने काही समजण्याच्या आतच आगीने रौद्र रूप धारण केले गाडीतील एका गर्भवती मातेसह इतर चौघे आगीच्या संकटात सापडले असता जवळच्या नागरीकांनी सतर्कता दाखवून मुस्लिम कुटुंबातील पाचही जनांना सुखरुप बाहेर काढून धीर देत पेटलेली कार विजवून एकाच कुटुंबातील पाच जनांना जीवदान दिले.
या घटनेची अधिक माहीती अशी की, नाशिक येथील अमन इजाज शेख हे आपल्या गर्भवती पत्नीसह कोपरगाव येथील हनुमान येथे राहणाऱ्या आपल्या आजारी नातेवाईकांना भेटण्यासाठी सहकुटुंब आले होते. भेटण्यासाठी नुकतेच कोपरगाव शहरातील गोकुळनगरी येथील समता स्कूल जवळच्या वळणावरुन हनुमान नगरकडे जात असताना दुपारी अडीचच्या सुमारास त्यांची फोर्ड कंपनीची गाडी एमएच ०४ एफ ए ६९७९ हीच्या पुढील बाजुच्या बोनेट मधुन आगीच्या ज्वाळा बाहेर निघुन लागल्या. गाडीमध्ये वायरिंग जळाल्याने आग लागली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.
गाडी चालवणारे अमन शेख यांनी काही समजण्याच्या आतच आगीने रौद्ररूप धारण केले. जवळच असलेले उमेश नानासाहेब नाईक यांनी कोपरगाव नगरपालीकेच्या अग्निशमन दलाला घटनेची माहीती दिली. रस्त्याच्या मधोमध गाडीने पेट घेतल्याने तसेच जवळच समता स्कूल होती त्यामुळे नागरीकांची चिंता वाढली होती.
धुमाळ यांनी माहीती देताच अग्निशमन दलाचे प्रमुख सुनिल आरण यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून अग्निशामक दलाच्या पथकाला घटनास्थळी रवाना केले. उमेश नाईक व स्थानिक नागरीकांना. तातडीने समता स्कूल येथील पाण्याच्या पाईपने गाडीला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला. काहीशी आग आटोक्यात आली इतक्या अग्निशमन दलाची गाडी आली आणि उर्वरित आग विझवून मोठी दुर्घटना टाळली.
कोपरगाव नगरपालिका अग्निशमन दलातील वाहन चालक प्रशांत शिंदे, फायरमन धनंजय सिंगर, सागर काटे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेवून आग आटोक्यात आणल्या बद्दल त्यांचे सर्व अभिनंदन केले जात आहे.
हिंदु – मुस्लिम वाद सध्या बहुतांश ठिकाणी खदखदत आहे. धर्मा-धर्मात वाद घालणाऱ्यांना माणुसकी हाच धर्म आहे हे कोपरगाव हिंदू नागरीकांनी पुन्हा एकदा दाखवून दिले. पेटलेल्या गाडीत मुस्लिम कुटुंब अडकलेले होते. पण त्यांना वाचवण्यासाठी हिंदू बांधवांनी जीवाची बाजी लावली. येथे धर्म पाहीला नाही तर माणुसकी धर्म जागवला . या घटनेने धर्माच्या नावाने वाद घालणाऱ्यांचे डोळे उघडतील का?