दोन भावांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

शेवगाव प्रतिनिधी, दि.६ :  शेवगाव पोलिस ठाण्यात एका अल्पवयीन युवतीने दिलेल्या फिर्यादीवरुन सचिन साहेबराव काते व त्याचा लहान भाऊ अमर साहेबराव काते रा. सामानगाव याचे विरुद्ध विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाख करण्यात आला आहे.

      सदर युवतीने दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, गुरुवारी सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास कॉलेज सुटल्याने मैत्रिणी सोबत घरी जात असताना पाठी मागून आलेल्या वीना क्रमांकाच्या कार मधून आलेल्या इसमाने गाडीच्या काचा खाली घेत मला पाहून म्हणाला रोड तुझ्या बापाचा आहे का? रस्त्यावरुन बाजूला चला, गाडी जायला रस्ता नाही. असे म्हणून शिवीगाळ केली. यावेळी सदर युवतीने शिवीगाळ करु नका, व्यवस्थित बोला असे म्हटले असता,   बाजूला बसलेल्या इसमाने गाडीतून हात बाहेर काढून ओढणीला धरुन ओढले. तसेच अंगाला हात लावून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. यावेळी आरडाओरड केल्याचे फिर्यादी मध्ये म्हटले आहे.

याच वेळी तेथून जाणाऱ्या एकाने सदर प्रकार पाहिला, त्यामुळे ते युवक सामानगाव येथील असल्याचे फिर्यादी मध्ये म्हटले आहे. दरम्यान गुन्हा दाखल होताच ते दोघे फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी सांगितले आहे.