शेवगांव प्रतिनिधी, दि ६ : शेवगावच्या सातपुतेनगर मधील किराणा दुकानदार दुर्योधन शेषराव दौंड (वय ५१) यांनी काल बुधवारी रात्री उशीरा फाशी घेऊन आपली जीवन यात्रा संपविली आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. परंतु शेअर मार्केटमध्ये लाखो रुपयांची फसवणूक झाल्याने ते सारखे व्यथित होते. त्यातूनच निर्माण झालेल्या वैफल्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची येथे चर्चा आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, बुधवारी ते आपल्या कोनोशी गावी गेले होते. तेथील शेतातील झाडाला गळफास घेऊन रात्री त्यांनी आत्महत्या केली. सकाळी शेतात कामाला गेलेल्यांना दौंड झाडाला लटकलेले आढळले. त्यांनी शेवगांव पोलिसांना कळवले. दुपारी त्यांचा मृतदेह शव विच्छेदनासाठी शेवगांवच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. पुढल तपास पोलीस करीत आहे.