कोपरगाव प्रतिनिधी, दि. २१ : कोपरगाव मतदार संघाच्या पूर्व भागातील भोजडे, गोधेगाव, लौकी, वारी, घोयेगाव व परिसरातील शेतीला लाभदायक ठरणाऱ्या कोळ नदीवरील साखळी बंधाऱ्यांना आ.आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून गोदावरी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येवून सावळगाव, शिरसगाव, गोधेगाव, घोयेगाव, लौकी, भोजडे आदी गावातील बंधारे पूर्ण क्षमतेने भरली असून लवकरच वारीचा बंधारा देखील भरणार आहे. आ.आशुतोष काळे यांनी दिलेला शब्द पूर्ण करून पूर्व भागातीलसावळगाव, शिरसगाव, गोधेगाव, घोयेगाव, लौकी, भोजडे, वारी व परिसरातील नागरिकांची पाण्याची मोठी अडचण दूर केल्यामुळे नागरिकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानत जलपूजन कार्यक्रमप्रसंगी त्यांचा जाहीर सत्कार केला आहे.
कोपरगाव मतदार संघाच्या पूर्व भागात असलेल्या कोळ नदीवरील बंधाऱ्यामध्ये मागील अनेक वर्षात पाणी सोडण्यात आले नव्हते. त्यामुळे २०१९ पर्यंत हि कोळ नदी कधीही पाट पाण्यामुळे प्रवाहित झालेली नव्हती. त्यामुळे नागरिकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह परिसरातील शेतीचे भवितव्य देखील धोक्यात आले होते. परंतु आ.आशुतोष काळे यांनी गोदावरी डाव्या कालव्याचे पाणी गोदावरी नदीपर्यंत आणून बंधारे भरून देण्याचा शब्द दिला होता. त्या शब्दाची पूर्तता करतांना आ.आशुतोष काळे यांनी निवडून येताच समृद्धी महामार्गाचे काम करीत असलेल्या गायत्री कंन्स्ट्रक्शन कंपनीकडून कोळ नदीवरील बंधाऱ्याचे खोलीकरण करून घेतले होते. त्यामुळे कोळ नदीच्या पाणी साठ्यात लक्षणीय वाढ झालेली आहे.
यावर्षी अवर्षणग्रस्त असलेल्या कोपरगाव मतदार संघात अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे पूर्व भागातील सावळगाव, शिरसगाव, गोधेगाव, घोयेगाव, लौकी, भोजडे, वारी व परिसरातील गावात देखील नागरिकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनाच्या देखील अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे पूर्व भागातील अनेक गावातील नागरिकांनी आ.आशुतोष काळे यांच्याकडे कोळ नदीवरील सर्व बंधारे भरून देण्याची केलेली मागणी आ.आशुतोष काळे यांनी तातडीने पूर्ण केल्यामुळे बहुतांश बंधारे पूर्ण क्षमतेने भरले असून वारीचा बंधारा देखील भरणार आहे.त्यामुळे पुढील दोन वर्षाचा पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा देखील प्रश्न मार्गी लागला असून भूगर्भातील पाणी पातळी देखील वाढण्यास मोठी मदत होणार आहे. या बंधाऱ्याच्या पाण्याचे नुकतेच आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते भोजडे येथे जलपूजन करण्यात आले आहे.
२०१९ पर्यंत आमचा भाग व आमच्या भागातील शेतकरी हे कायम स्वरूपी दुष्काळी होते. परंतु २०१९ पासून आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून आमचे कोळ नदीवर सर्वच बंधारे भरले जात आहे. त्यामुळे आमचा पिण्याच्या व सिंचनाचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. यानिमित्ताने पाणी प्रश्नाची खरी जाण असणारा व दिलेला शब्द पूर्ण करून शब्दाला जागणारा नेता आ. आशुतोष काळे यांच्या रूपाने मतदार संघाला लाभला आहे. त्यांनी बंधारे भरल्यानंतरच जलपूजन केले आहे. मात्र काही ठिकाणी ज्यांचे बंधारे भरण्यात कुठलेही योगदान नाही. त्यांना पाणी कुणामुळे सोडण्यात आले याची माहिती देखील आहे. ते मात्र श्रेय घेण्यासाठी अगोदरच जलपूजन उरकून घेवून फुकटचे श्रेय घेण्यासाठी करीत असलेल्या धडपडीची कीव येते. – विक्रम सिनगर लाभार्थी शेतकरी.