शेवगावमध्ये भगतसिंग जयंती साजरी

शेवगांव प्रतिनिधी, दि. २८ :  भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आॅल इंडिया स्टुडंटस फेडरेशन, आॅल इंडिया युथ फेडरेशन, शहिद भगतसिंग हाॅकर्स युनियन, लाल बावटा रिक्षा युनियन यांच्या वतीने काॅम्रेड शहिद भगतसिंग जयंतीनिमित्त शहिद भगसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन इन्कलाब जिंदाबाद, शहिद भगतसिंग अमर रहे, शहिद भगतसिंग के देश में जात पात धर्म का झगडा नहीं चलेंगा या घोषणांनी परीसर दुमदुमला.

यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसचिव काॅम्रेड सुभाष लांडे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, पोलीस निरीक्षक समाधान नागरे, भाकपचे काॅ.संजय नांगरे, तालुका सचिव संदिप इथापे, बापुराव राशिनकर, बबन पवार, भगवान गायकवाड, राम लांडे, अजिंक्य लांडे, सागर फडके, गोपनिय शाखेचे बप्पासाहेब धाकतोडे, शहिद भगत सिंग हाॅकर्स युनियनचे जुबेर शेख, जावेद बागवान, इरफान पठाण, ईस्माइल शेख, शेखर तिजोरे लाल बावटा रिक्षा युनियनचे राज गायकवाड, मोहीते, मगर, काथवटे, आॅल इंडिया स्टुडंटस फेडरेशनचे व आॅल इंडिया युथ फेडरेशनचे जिल्हा समन्वयक वैभव शिंदे आदीसह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.