विवेक कोल्हे यांनी युवकांना नोकऱ्या देवून केली अर्थक्रांती

नोकरी महोत्सवामध्ये बेरोजगारांची झुंबड उडाली

कोपरगाव प्रतिनिधी, दि.५ : कोपरगाव मतदार संघातील हजारो बेरोजगारांना एकाचवेळी लाखो रुपयांचे पॅकेज असणारी नोकरी देवून संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी बेरोजगारांना नवसंजीवनी दिली आणि तालुक्यात अर्थक्रांती केल्याची भावना नोकरी मिळवणाऱ्या बेरोजगारांनी व्यक्त करीत कोल्हेंचे आभार मानले.

 शनिवारी राष्ट्र संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज समाधी मंदीर परिसरातील भक्त निवास येथे संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. १ हजार बेरोजगारांना नोकरी देण्यासाठी शंभर मोठमोठ्या कंपन्यांना बोलावण्यात आले होते. यावेळी नोकरी मिळवण्यासाठी बेरोजगार युवक युवती व दिव्यांगांची झुंबड उडाली होती. यावेळी हजारो बेरोजगारांना मोठमोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी देवून विवेक कोल्हे यांनी अनेकांच्या जीवनाला नवसंजीवनी  देवून मतदार संघात अर्थक्रांती केल्याचे दिसुन आले. 

 कोपरगाव मतदार संघातील सर्व सुशिक्षित बेरोजगारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित संजीवनी नोकरी महोत्सव २०२४चे उद्घाटन संजीवनी नोकरी महोत्सवाचे प्रणेते विवेक कोल्हे, संजीवनी विद्यापिठाचे विश्वस्त अमित कोल्हे, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे सरचिटणीस हनुमंत भोंगळे, एस जे एस मेडिकल काॅलेजचे प्रमुख प्रसाद कातकडे, उद्योजक राजेश ठोळे, संजय भन्साळी, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश वाणी, डॉ.दत्तात्रय मुळे, डॉ. रामदास आव्हाड, सुधीर डागा, डॉ. एकनाथ गोंदकर, नितीन शिंदे, दिपक गायकवाड, आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. 

 यावेळी उपस्थितांसमोर मनोगत व्यक्त करताना विवेक कोल्हे म्हणाले की, कोल्हे परिवाराने कायम समाजाचं आपण काही तरी देणं लागतं या उदात्त हेतूने हा नोकरी मेळावा भरवला आहे कोपरगाव तालुक्याचे हक्काचे पाणी गेल्याने तसेच बिगर सिंचनाचे पाण्याचे आरक्षण ८० टक्के झाल्यामुळे  कृषिप्रधान असलेल्या तालुक्यातील शेती उजाड झाली. शिक्षण होवूनही युवकांना नोकऱ्या मिळत नाहीत परिणामी युवा पिढी चुकिच्या दिशेने भरकटत चालली आहे.

सध्या तालुक्यात ६० हजार सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम नाही म्हणून हा नोकरी महोत्सव भरविण्यात आला येथे एका दिवशी तब्बल ३ हजार १२४ बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचा विक्रम संजीवनीने केला आहे. त्यामध्ये ४ लाख २० हजार रुपयांचे पॅकेज मिळवून दिले. 

 दिवसभराच्या नोकरी महोत्सवात ९ हजार ६८० बेरोजगार युवक युवतींनी नावनोंदणी  केली त्यापैकी ३ हजार १२४ बेरोजगारांच्या मुलाखती होवून नोकरीसाठी रुजू होण्याचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले  ८२४ उमेदवारांना कामाचा पुर्व अनुभव असल्याने त्यांना कंपन्यांनी थेट कंपनीमध्ये बोलाविल्याने त्यांचे पॅकेज अधिक होवू शकते. उर्वरित सर्व बेरोजगारांना जाॅबकार्ड देवुन येत्या काही दिवसांत अधिकाधिक पॅकजची नोकरी देण्याची व्यवस्था केल्याची माहीती देण्यात आली. हा नोकरी महोत्सव यशस्वी करण्यासाठी संजीवनी उद्योग समुहाचे शिक्षण संस्थेतील शेकडो कर्मचारी मेहनत घेत होते.

 नोकरी महोत्सवाच्या ठिकाणी रोजगार मिळावा म्हणून बेरोजगारांचा महापुर आला होता. याठिकाणी सर्वांना नोकरी मिळावी यांची व्यवस्था करण्यात आली होती. उमेदवारांना कागदपञासह इतर कोणतीही तांञिक अडचण येणार नाही याची योग्य व्यवस्था करण्यात आल्याने पालकासह सर्वजन आनंदी होते. कोल्हे यांच्या ऐतिहासिक उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.