कोपरगावमध्ये नवी एमआयडीसी आणणार – आमदार काळे 

 काळेंच्या प्रचाराचा नारळ फुटला, वचननामा केला प्रसिध्द 

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. ६ :  कोपरगाव मतदार संघातील वाढती बेरोजगारी संपवण्यासाठी व शहाराजवळील शासकीय जागेत नवी एमआयडीसी आणणार असल्याचे वचन आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केले.  कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्यावतीने महायुतीचे उमेदवार  म्हणुन आमदार आशुतोष काळे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असुन त्याच्या प्रचाराचा नारळ शहरातील जुनी गंगा देवी मंदीरात फोडून विधीवत पुजा करीत प्रचार शुभारंभ करण्यात आला.

यावेळी आशुतोष काळे यांच्या समवेत पत्नी चैताली काळे, माजी आमदार अशोकराव काळे, महानंद दूध संघाचे माजी अध्यक्ष राजेश परजणे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, राजेंद्र जाधव, रविंद्र बोरावके, कृष्णा आढाव, संभाजी काळे, सुनिल गंगुले, पद्माकांत कुदळे, डाॅ. अजय गर्जे, मंदार पहाडे, शैलेश साबळे, डाॅ. तुषार गलांडे, धरमचंद बागरेचा, फकिर महंमद कुरेशी, नवाज कुरेशी, विजय ञिभुवन, राजेंद्र बोरावके, प्रतिभा शिलेदार यांच्यासह विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बुधवारी सकाळी आमदार काळे यांनी सपत्नीक विधीवत देवीची पुजा करुन प्रचाराचा नारळ फोडला त्यानंतर कार्यकर्त्यांसह शहरातुन रॅली काढीत शक्ती प्रदर्शन करीत कृष्णाई मंगल कार्यालयात उपमुख्यमंञी अजित पवार यांनी आयोजित केलेल्या राज्यातील ५९ उमेदवारांच्या प्रचार  घोषणापञाचे प्रकाशन लाईव करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अजित पवार यांनी उपस्थित उमेदवार व कार्यकर्ते पञकार यांच्याशी संवाद साधुन जनहितांच्या योजनांची माहीती दिली. नव्या दृष्टीकोण ठेवून पवार यांनी  जाहीरनामा तयार केला आहेत त्यातील ५० उमेदवारांचे  जाहीरनामे प्रकाशित केले .

 प्रचाराचा नवा फंडा वापरत असल्याने नागरीकांचा प्रतिसाद मिळतोय. आमदार म्हणुन केलेले विकास कामे जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न यातुन  केला जातोय.  राज्याच्या समृद्धीसाठी आपला पक्ष  कार्य करणार आहे. शेती व शेतकऱ्यांच्या विकासाचा वादा आहे असे म्हणत अजित पवार यांनी राज्यातील ५९ उमेदवारांशी संवाद साधून त्यांच्या शंका कुशंकाचे निरसन करताना ते पुढे म्हणाले की,  शरद पवार यांच्या बद्दलची सहानुभुती लोकसभेला जाणवली होती,  पण या  विधानसभेला ती सहनभुती  दिसत नाही असेही ते शेवटी म्हणाले. 

 यावेळी आमदार आशुतोष काळे पुढे म्हणाले की, गेल्या पाच वर्षा सत्तेच्या माध्यमातुन मतदार संघात अनेक विकास कामे करता आली काही बाकी आहेत ती पुढील काळात पुर्ण करण्याचं वचन देत आहे. तोच वचनपुर्तीचा  वचननामा आज प्रसिध्द करीत आहे. विकासातून  मतदार संघाचे रुप बदलण्याचा ध्यास मनी आहे. आगामी काळात सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवणार आहे.  जनकल्याणाची सामुदायीक व वैयक्तीक विकास कामे पुर्ण केली काही होण्याच्या मार्गावर आहेत ती पुर्ण करणार आहे. कोपरगाव हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे विकासाची संधी आहे.असे म्हणत काळे यांनी आपला वचननामा प्रसिध्द केला. यावेळी शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Leave a Reply