शेवगाव प्रतिनिधी, दि. १३ : मतदार संघात ज्यांच्या बद्दल नाराजी आढळली नाही; कुठलीही घमेंड असल्याचे ऐकिवात आले नाही; पक्षाची ध्येय धोरणे सर्वाधिक मोठ्या प्रमाणात प्रामाणिकपणे राबविली आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे सर्वसामान्यांना सहज कुठेही, केव्हांही भेटू शकणाऱ्या एकमेव लोक प्रतिनिधी म्हणून आमदार मोनिकाताई राजळे असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे केंद्रिय निरिक्षक तथा गुजराथचे आमदार महेश कासवाला यांनी येथे केले.
भारतीय जनता पक्षाचे केंद्रिय निरीक्षक म्हणून आमदार कासवा सध्या २२२ शेवगाव पाथर्डी मतदार संघात कार्यरत आहेत. शेवगाव येथे पत्रकारांसी वार्तालाप करतांना ते बोलत होते. आमदार कासवा भाजपात वरिष्ठ पातळीवर काम करणारे नेते असून मतदार संघातील विविध घटकासी ते संपर्क साधून लोक भावना समजून घेत भाजपाच्या आमदार राजळे यांनाच मत का द्यायचे हे पटवून देत आहेत.
यावेळी आमदार कासवा म्हणाले, मी देशातील तब्बल बारा राज्यातील आमदार खासदारांच्या निवडणुक निरिक्षक म्हणून कार्य केले आहे. या सर्व ठिकाणच्या लोकप्रतिनिधी पेक्षा येथील आमदार राजळे या महिला असून देखील सर्वाधिक सरस उमेदवार असल्याचे माझे निरीक्षण आहे आणि म्हणूनच त्यांना पक्षाने तिसऱ्यांदा उमेदवारी दिली असून पक्षाचा हा निर्णय येथील सुज्ञ मतदार रास्त असल्याचे ठरवून २० तारखेला विक्रमी मताधिक्याने निवडून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ मतदार संघातील तब्बल एक लाख २३ हजार महिला पर्यंत पोहचवून त्यांनी राज्यात अव्वल नंबरचे काम करून गरजू महिलांना कोट्यावधीचा लाभ मिळवून दिल्याचे उदाहरणही त्यांनी यावेळी दिले.