घुले परीवराने मतदारसंघ काढला पिंजून

शेवगाव प्रतिनिधी, दि. १५ : शेवगाव पाथर्डी २२२ विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या समर्थकांनी ही निवडणुक प्रतिष्ठेची केली असून घुले कुटुंबियानी देखील ती आर या पार च्या भूमिकेतून घेतली आहे.

घुले कुटुंबातील उमेदवारासह सर्व सदस्य ज्येष्ठ बंधू  ज्ञानेश्वर उद्योग समुहाचे अध्यक्ष तथा माजी आमदार नरेंद्र पाटील  घुले, पुतणे, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील, पत्नी, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राजश्री घुले पाटील हे  सर्वजण पहाटेच घराबाहेर पडत असून पायाला भिंगरी लावून प्रत्येकजण वेगवेगळ्या गटातील किमान दहा-पंधरा गावे पिंजून काढत घरोघरी गृहभेटी देत मतदारासी संपर्क साधत आहेत.

राजश्रीताई तर महिलांसी असा संपर्क  करतात कीं, थेट स्वयंपाक घरात जाऊन त्यांच्यासी आपुलकीने कोणती भाजी करताय, तसेच मुलाबाळांची चौकशी करत स्नेह निर्माण करतात. थोड्यावेळ अशाच गप्पा झाल्या की, त्या महिलेवर असं गारुड होत की, ती महिला आपण होऊनच पुढच्या घरी प्रचाराला जाण्यासाठी  त्यांच्या समवेत असलेल्या महिला कार्यकर्त्यांच्या जथ्यात सहभागी झालेल्या असतात असं चित्र आहे.

या प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो.  चार-सहा जणांचा शिदोरीचा डबा सोबत घेऊन ही मंडळी आपापल्या नियोजित गटात सकाळीच मार्गस्थ होतात. जेवणाच्या वेळी गाडीतच सहकाऱ्यासह शिदोरी सोडली जाते. पुन्हा रात्री कोण कधी घरी परतेल याचा भरवसा नसतो. रात्री दहा अकराच्या आत कोणीच घरी येत नाही.  घुले बंधूच्या तर त्यानंतर गुप्त बैठका व दुसऱ्या दिवसाचे नियोजन करता रात्रीचे बारा-एक होतात. सध्या रोजच हा सिलसिला चालू आहे.

  ज्ञानेवरचे ज्येष्ठ संचालक काकासाहेब नरवडे,  कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय कोळगे, ताहेर पटेल, बबनराव भुसारी, अंबादास कळमकर, रोहन साबळे, संतोष पावसे, गणेश खंबरे, विजय पोटफोडे, एकनाथ कसाळ, मोहनराव देशमुख, रामनाथ राजपुरे, गलांडे असे अनेक जिवाभावाचे कार्यकर्ते  सावली सारखे यावेळी त्यांच्या समवेत असतात.

Leave a Reply