
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २६ : पाटबंधारे विभागाने गोदावरी कालव्यांचे रब्बी हंगाम २०२४-२५ साठी ७ नंबर पाणी मागणी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यासाठी केलेल्या सूचनेवरून लाभधारक शेतकऱ्यांना ०५ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज दाखल न केलेल्या उर्वरित लाभधारक शेतकऱ्यांनी आपले ७ नंबर पाणी मागणी अर्ज तातडीने दाखल करावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.

गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम २०२४-२५ साठी पाटबंधारे विभागाकडून जाहीर प्रगटन प्रसिद्ध करण्यात येवून रब्बी हंगामातील पिकांसाठी पाटबंधारे विभागाकडून डाव्या-उजव्या कालव्यांना सात नंबर पाणी मागणी अर्जावर आवर्तन देण्याचे जाहीर करण्यात आलेले आहे. त्यानुसार १४ नोव्हेंबर पर्यंत पाणी मागणी अर्ज भरणे लाभधारक शेतकऱ्यांसाठी बंधनकारक होते.

परंतु हि मुदत संपल्यामुळे काही लाभधारक शेतकरी मात्र आपले अर्ज मुदतीच्या आत दाखल करू शकले नाहीत. त्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये यासाठी आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला ७ नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या सूचनेनुसार पाटबंधारे विभागाकडून ०५ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

अजूनही जे लाभधारक शेतकरी आपला पाणी मागणी अर्ज दाखल करू शकले नाही अशा शेतकऱ्यांनी आपले अर्ज सबंधित विभागाकडे तातडीने दाखल करावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.



