डॉ. प्रशांत भालेराव यांना लोकमत ग्रोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन पुरस्कार जाहीर

शेवगाव प्रतिनिधी, दि. २९ : श्री रेणुका माता मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर प्रशांत चंद्रकांत भालेराव यांना  लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असून येत्या ५ डिसेंबरलाअझरबैजानच्या ‘गुलाबी थंड वाऱ्याची नगरी’ म्हणून प्रख्यात असलेल्या “बकू” या राजधानीमध्ये आयोजित विशेष सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

श्री रेणुकामाता  मस्टीस्टेट को ऑप. अर्बन क्रेडीट सोसायटी या संस्थेने गेल्या दोन दशकात देशातील नऊ राज्यात तब्बल १४० शाखामधून  दहा लाखावर ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या पारदर्शक व विश्वसनीय सेवेमुळे आर्थिक क्षेत्रात मोठी लक्षणिय कामगिरी बजावली आहे.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज व नॅशनल स्टॉक एक्सचेंज सारख्या आर्थिक क्षेत्रातील दिग्गज संस्थेचे ते अधिकृत ब्रोकर असून विमा नियंत्रक प्राधिकरण (ईरीडा ) चे देखील ते  प्रतिनिधी असून वीमा क्षेत्रातील विविध सेवा देखील त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. डॉ. भालेराव यांच्या व्यवसायाचे जाळे देशासह परदेशात ही अनेक ठिकाणी पसरले आहे.

  त्यांच्या या संस्थेच्या सहकार्यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला, अनेकांना आपल्या  उद्योग व्यवसायात भरभराट करता आली आहे. भालेराव यांच्या संकल्पनेतून स्थापित रेणुका फाऊडेशनच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक भान जपले आहे. हुशार  गरजू , गरीब विद्यार्थांचे पालकत्व  स्विकारून त्यांना गणवेश, शैक्षणिक शुल्क, शिष्यवृत्ती, विविध शैक्षणिक संस्थांना शाळा खोल्या, क्रीडा साहित्य, खेळणी, पुस्तके, बेंच, मतिमंद मुलांच्या शाळांना व वृद्धाश्रमांना चादरी, रग, मिष्टन्न, ग्रामपंचायतीना प्रोजेक्टर, स्मशानभूमि सुशोभिकरण, सीसी टीव्ही कॅमेरे, गोशाळा, मंदिर उभारणी,  अशा कार्यात संस्थेने सातत्याने भरीव सहकार्य केले आहे. डॉ. प्रशांत नाना भालेराव यांच्या  या  कार्याची ख्याती  जागतिक  पातळीवर पोहचली आहे. त्यामुळे यशश्वी अर्थतज्ञ म्हणून त्यांचा सर्वदूर ‘ लौकिक झाला असून या अगोदर देखील देशविदेश पातळीवरील अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

बॅकिग आणि फायनान्स या विषयात त्यांचा विशेष अभ्यास असल्याने अमेरिकेच्या ग्लोबल पीस युनिव्हर्सीटीने त्याची दखल घेऊन त्यांना डॉक्टरेट पदवीने सन्मानित केले आहे. आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत दिल्ली सरकारच्या ओबीसी आयोगाकडून देण्यात येणाऱ्या  देशपातळीवरील ‘राष्ट्रीय एकता’ पुरस्काराने, तसेच मुंबईच्या ‘कनेक्ट स्टार ‘  संस्थेच्या वतीने आर्थिक, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणारा  ‘इंटरनॅशनल ग्लोरी अवार्ड २०२१ ‘  अशा एक ना अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. भालेराव यांच्या कार्यास आध्यात्मिक अधिष्ठान असून श्री क्षेत्र अमरापूर येथील प्रख्यात, निसर्गरम्य व भव्य अशा  श्रीरेणुका माता देवस्थानाची निर्मिती भालेराव नानानीच आपल्या अपार श्रध्देतून केली आहे.

Leave a Reply