शेवगाव प्रतिनिधी, दि. १८ : येथील पोलीस ठाण्यात तक्रारदाराच्या मुलाच्या विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याच्या नावाखाली बारा हजाराची लाच मागितल्या प्रकरणी, एका खाजगी इसमाच्या विरोधात, लाच प्रतिबंधक विभागाने शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील बोधेगाव येथील आफताब नजीर शेख ( वय २२ वर्ष ) रा.साईधाम सोसायटी याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४१ वर्षीय तक्रारदाराच्या मुलाच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी तसेच सदर गुन्ह्यात मदत करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक माळी यांच्या करिता बारा हजार रुपयांची लाचेची मागणी आफताब याने केली.
याबाबत तक्रारदार यांनी संबंधित प्रकरणी लाच प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. याबाबत लाच प्रतिबंधक विभागाने पडताळणी असता आफताब याने लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याने त्याचे विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाच प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस निरीक्षक राजु आल्हाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राधा खेमनर, पोलीस अंमलदार सचिन सुद्रुक, गजानन गायकवाड, दशरथ लाड यांनी सदरची कारवाई केली आहे.