कोपरगाव प्रतिनिधी, दि. १३ : शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या निवडणूकीसाठी आज मतदान झाले यामध्ये सुशिक्षित मतदारापेक्षा कष्टकरी, मजुरांनी सकाळी सात वाजल्यापासुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर लावल्या होत्या काही मजुरांनी कुटूंबासह आपला मतदानाचा हक्क बजावून कामांवर रुजू झाल्याचे चिञ कोपरगाव मध्ये पहायला मिळाले.
विशेषतः शहरातील सेवा निकेतन हायस्कूल व खडकी येथील नगरपालीकेच्या शाळेतील मतदान केंद्रावर सकाळी सात वाजल्यापासून मतदारांच्या रांगा लागल्या होत्या काही मतदान केंद्रावर सकाळी दहा वाजे पर्यंत विक्रमी मतदान झाले होते. तर काही मतदान केंद्रावर शुकशुकाट दिसुन आला. कोपरगाव शहरातील झोपडपट्टी व सर्वसामान्य नागरी वस्तीतील लोक यापुर्वी मतदान करण्यासाठी सहजासहजी बाहेर पडत नसे. खास करुन लोकसभेच्या निवडणुकीत तर मुळीच नाही. माञ या निवडणुकीत वेगळे चिञ पहायला मिळाले.
नगरपालीकेच्या निवडणुकीलाही इतकी गर्दी नसायची त्यापेक्षा अधिक गर्दी आज काही मतदान केंद्रावर सकाळी सात वाजल्यापासून ते दुपारपर्यंत कायम होती. कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत लांबलचक रांगा लावून मतदानाचा हक्क बजावत असल्याचे पाहून अनेकांना आश्चर्य वाटत होते.
दरम्यान तहसीलदार संदीप कुमार भोसले यांनी मतदारांमध्ये मतदान करण्यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती केल्याने मतदानाचे महत्त्व सर्वसामान्य नागरीकांना पटवून दिल्यामुळे यावेळी लोकसभेला सर्वसामान्य मतदारांनी मतदानासाठी घराबाहेर पडून मतदान केल्याने मतांचा टक्का वाढला आहे. हा वाढलेला टक्का २० उमेदवारांपैकी कोणाला कामी येतो हे निकालावरून कळणार आहे.
मध्ये काळे-कोल्हे परिवाराने केले मतदान
कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, माजी आमदार अशोकराव काळे, पुष्पाताई काळे, चैताली काळे यांनी तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील मतदान केंद्रात आपला मतदानाचा हक्क बजावला.
तर माजी आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे यांनी आपल्या संपूर्ण परिवारासह येसगाव येथील मतदान केंद्रात जावून आपल्या मतदानाचा हक्क बजावला.