शेवगाव प्रतिनिधी, दि. २७ : तालुक्यातील चापडगाव हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत सात क्रीडा प्रकारातील वेगवेगळ्या गटातील चोविस प्रथम क्रमांकापैकी अकरा प्रथम क्रमांक ठाकूर निमगाव शाळेने पटकावून पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले.

शंभर मीटर धावणे मोठा गट प्रथम क्रमांक -वैभव पंढरीनाथ फरताळे, १०० मीटर धावणे मुली प्रथम क्रमांक समृद्धी किशोर निजवे, लांब उडी मोठा गट प्रथम क्रमांक -वैभव पंढरीनाथ फरताळे, लांब उडी मोठा गट मुली प्रथम क्रमांक – समृद्धी किशोर निजवे, उंच उडी मोठा गट मुली प्रथम क्रमांक वर्षा अशोक गरड, गोळा फेक मुले प्रथम क्रमांक -अनिकेत जनार्दन शिंदे, थाळी फेक मुले प्रथम – क्रमांक वैभव पंढरीनाथ फरताळे, थाळी फेक मुली प्रथम क्रमांक -मुक्ता संतोष निजवे,

खोखो मोठा मुले प्रथम क्रमांक तसेच मुली मोठा गट प्रथम क्रमांक, कबड्डी मोठा गट मुले प्रथम क्रमांक व मुली मोठा गट प्रथम क्रमांक, ५० मी धावणे द्वितीय क्रमांक संकेत रामहरी निजवे, उंच उडी मुले द्वितीय क्रमांक – कृष्णा सोपान गायकवाड, गोळा फेक मुली द्वितीय क्रमांक – समृद्धी किशोर निजवे, लांब उडी मुले तृतीय क्रमांक – संकेत रामहरी निजवे या क्रीडापटूंनी मिळवला.

या घवघवीत यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते, शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. शंकर गाडेकर, केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर जाधव गावच्या सरपंच सुनिता कातकडे व सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विठ्ठल निजवे व सदस्य व सर्व ग्रामस्थ यांनी स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार शहाणे पदवीधर शिक्षक घनश्याम कातकडे, बाबुराव मुटकुळे, संगीता धर्माधिकारी, कल्पना बोडखे, अविनाश काटे, शारदा डोईफोडे, विशाल घोडसे यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
