राहाता प्रतिनिधी, दि. ३ : अखिल भारतीय समता परिषद, समस्त माळी पंच व सावता माळी ट्रस्टच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती राहाता शहरात साजरी करण्यात आली.

शुक्रवारी सकाळी राहाता तालुका अखिल भारतीय समता परिषद, सावता माळी ट्रस्ट व समस्त माळी पंच कमिटीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करत छत्रपती शिवाजी महाराज ,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत शहरातील नागरिकांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याची माहिती देताना सांगितले की, महिलांकरिता शिक्षणाचे दारे खुले करण्यासाठी सावित्रीबाई फुले यांना जीवनात मोठा संघर्ष करावा लागला.

स्त्रियांनी फक्त चूल आणि मूल या चौकटीत पुरते मर्यादित न राहत शिक्षणातून विविध क्षेत्रात पुढे यावे व स्वावलंबी बनावे यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. पतीच्या मृत्यूनंतर महिलांची सती जाण्याची प्रथा होती ती प्रथा त्यांनी मोडीत काढली. १ जानेवारी १८४८ महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी पहिली शाळा भिडेवाडा पुणे येथे काढली. महिलांची केशवपन प्रथा बंद करण्यासाठी न्हावी समाजाचा संप घडवून आणला त्या उत्कृष्ट लेखिका होत्या अशा त्यांच्या विविध आठवणींचा उजाळा राहात्यातील ग्रामस्थांनी त्यांच्या जयंतीनिमित्त दिला.

या कार्यक्रमाप्रसंगी गणेश कारखान्याची माजी चेअरमन मुकुंदराव सदाफळ, नारायणराव कार्ले, कैलास सदाफळ, डॉ. के.वाय गाडेकर, साहेबराव निधाने ,राजेंद्र वाबळे, प्रा. राजेंद्र निकाळे, धनंजय गाडेकर, डॉ. स्वाधीन गाडेकर, समता परिषद राहाता तालुका अध्यक्ष किशोर बोरावके, शहराध्यक्ष संतोष लोंढे, भाऊसाहेब जेजुरकर, अँड. रघुनाथ बोठे, सुरेश जेजुरकर, चंद्रभान मेहेत्रे, भगवान टिळेकर, मोहनराव सदाफळ, डॉ. संजय उबाळे, बाबासाहेब गाडेकर, मुन्ना सदाफळ, सावता ट्रस्टचे अध्यक्ष मच्छिंद्र बनकर, सावता ट्रस्टचे उपाध्यक्ष संदीप गाडेकर,

सोसायटीचे चेअरमन सुरेश गाडेकर, स्वप्निल गाडेकर, भीमसेन गाडेकर, दौलत घोडेकर, सचीन बनकर, विशाल गाडेकर, राधाकिसन भुजबळ, आप्पासाहेब मेहेत्रे, राजेंद्र जेजुरकर, प्रदीप बनकर, मच्छिंद्र निधाने, हरिभाऊ गाडेकर, दिलिप बागडे, अशोक गाडेकर, हेमंत आनप, डॉ.रोहिणी पारखे, सौ शालिनीताई जेजुरकर, नीलमताई सोळंकी, चंद्रकला गायकवाड, प्रज्ञा ताम्हाणे आदी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय मोगले यांनी केले तर उपस्थितांचे आभार चेतन गाडेकर यांनी मानले.
