राज्यस्तरीय दिव्यांग ऊर्जा पुरस्काराने मुख्यापक भगत सन्मानित

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३ : तालुक्यातील ठाकूर निमगावचे दिव्यांग मुख्याध्यापक तुकाराम भगत यांना महाराष्ट्रातील सर्वात उंच असणारे कळसूबाई शिखर सर केल्याबद्दल शिव ऊर्जा प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय दिव्यांग ऊर्जा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

या  पुरस्काराबद्दल गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते, विस्तार अधिकारी शंकर गाडेकर,  शैलजा राऊळ, केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर जाधव यांनी त्यांचे अभिनंदन  केले आहे.

अल्पदृष्टी दिव्यांग असलेले भगत  चापडगाव येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. गेली अनेक वर्षापासून शिक्षण क्षेत्रातील विशेष काम व सामाजिक बांधिलकी जपत स्वतःला अल्पदृष्टी असतानाही सामाजिक कार्यामध्ये ते नेहमीच अग्रेसर असतात. आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने  या अगोदरही दोन वेळेस त्यांनी  कळसुबाई शिखर सर केले आहे.

शिव उर्जा प्रतिष्ठानच्या वतीने  गेल्या  बारा वर्षापासून  राज्यस्तरीय दिव्यांग ऊर्जा पुरस्कार दिला जातो. यावर्षी प्रतिष्ठानने भगत यांच्या कार्याची दरवल घेऊन  त्यांना कळसूबाई शिखराच्या पायथ्यासी असलेल्या बारी गावात आयोजित सोहळ्यात सरपंच निर्मळ, संस्थेचे सचिव  कचरू चांभारे  यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातून अनेक दिव्यांग बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.