प्रिया दत्त साई चरणी लिन, आईवडलांच्या आठवणीने झाल्या भावुक
शिर्डी प्रतिनिधी, दि. ८ : पुर्वीच्या काळात राजकीय पक्ष आणी नेते वेगवेगळ्या पक्षात असतानाही एकमेकांप्रती आदर आणि सन्मान राखत होते मात्र दुदैवाने अलिकडच्या काही वर्षापासुन एकमेकांच्या संबंधात प्रेम -जिल्हाळा आणी आपुलकीचे नाते दिसून येत नसल्याची खंत माजी खा. प्रिया दत्त यांनी व्यक्त केली. प्रथम देश आणि नंतर पक्ष अशी भुमिका राजकीय पक्षांच्या नेत्यांनी घेतली पाहीजे असेही त्यागनी सांगीतले.

माजी खासदार प्रिया दत्त यांनी बुधवारी शिर्डीत येवून साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. साई दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना प्रिया दत्त यांचे डोळे पाणावले होते. यावर बोलतांना त्यांनी माझी आई साईबाबांची परमभक्त होती. ती आजारी असतांनाही शिर्डीला येत असत आज शिर्डीत येवुन साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या आठवणी माझ्या मनात जाग्या झाल्या आहेत. दत्त परिवाराने जिवनात अनेक चढ उतार बघितले. साईबाबांचा आशिर्वाद असला तर नक्कीच चांगल होत असल्याचे त्यांनी सांगीतले.

साईबाबांच्या दर्शनासाठी मी ज्यावेळी येते त्यावेळी काहीच मागत नाही. जीवनात अनेकदा चढउतार येत असतात. अडचणीचा सामना करण्याची शक्ती साईबाबांनाकडून मिळावी एवढीच प्रार्थना साई चरणी केली असल्याच प्रिया दत्त यांनी सांगीतले. साईबाबांचे दर्शन घेवून मंदिरा बाहेर आल्यानंतर लवकरच आपला भाउ अभिनेता संजय दत्त आणि आम्ही दोघी बहिणींनी एकत्रित साईंच्या दर्शनासाठी यावे म्हणून विचार आला.

साईबाबांचे बोलावने आले तर लवकरच आम्ही भाऊ- बहीणी तिघेजन एकत्रीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणार असल्याचही यावेळी प्रिया दत्त यांनी सांगितले. नवीन वर्षा निमित्ताने शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येण्याचा योग आला. मी नेहमी येत असते मात्र आता जानेवारी हा नवीन वर्षाचा पहिला महिना असल्याने नवीन वर्षा निमित्ताने साईबाबांचे दर्शन घेवून आनंद वाटला असल्याचे आवर्जून दत्त म्हणाल्या.

साईबाबा संस्थानच्या वतीने प्रिया दत्त यांचा शॉल साई मूर्ती देवून सत्कार करण्यात आला. प्रिया दत्त मंदिराचा व्हीआयपी गेट क्रमांक दोन नंबर मधून आत मध्ये येत असतांना काही अपंग व वृध्द भाविक व्हीलचेअर वरून मंदिरात जात असताना प्रिया दत्त यांनी त्यांना जागा करून देत काही काळ थांबून राहिल्या असल्या. त्यांच्या या कृतीचे भाविकांकडून कौतुक करण्यात आले शिर्डीतील राष्ट्रवादीचे संग्राम कोते यांनी देखील त्यांचा सत्कार केला.

