समाजामध्ये पक्षी संवर्धनाची भावना वृद्धिंगत होण्याची गरज – ॲड. दीपलक्ष्मी म्हसे

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३ :  पक्षीमित्र संघटनेच्या वतीने करण्यात येत असलेले पक्षी संवर्धनाचे काम निसर्ग, पर्यावरण संतुलन राखण्यासाठी सर्वोत्तम आहे. या संघटनेने शासनाच्या मागे लागून त्यासंदर्भात आवश्यक ते कायदे करावेत. पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी आपण कटिबद्ध राहिले पाहिजे. या संमेलनातून पक्षिमित्रांचा उद्देश फलद्रूप झाला पहिजे. पक्षांची काळजी घेण्याची आणि पक्षी निरीक्षणाची व संवर्धनाची भावना वृध्दींगत झाली पाहिजेअसे आवाहन ॲड. दीपलक्ष्मी म्हसे यांनी केले.

महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना व न्यू आर्ट्स, कॉमर्स अॅन्ड सायन्स कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने गेली दोन दिवस ३७ वे महाराष्ट्र राज्य पक्षिमित्र संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. समारोप प्रसंगी अध्यक्षपदावरून ॲड. म्हसे बोलत होत्या. यावेळी मृदूला कुलकर्णी, दिगंबर महाजन, मिलिंद  शिरभाते, अरुण लाट आदी प्रतिनिधींनीनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान किलबिलाट या अंकाचे प्रकाशन  करण्यात आले. 

 संमेलनाच्या समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे यांनी प्रास्ताविक केले. स्वागताध्यक्ष बापूसाहेब भोसले यांनी पक्षीमित्र संघटनेचा लेखाजोखा मांडत अगोदरच्या विविध ठिकाणी पार पडलेल्या संमेलनातील अनुभवआपल्या खास शैलीत कथन  केले. संघटनेचे अध्यक्ष जयंत वडतकर यांनी दोन दिवसीय संमेलनाचा आढावा घेतला.

२१ पक्षिमित्रानी याठिकाणी केलेल्या विचार मंथनाचा उहापोह केला. ३८ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन अमरावती येथे होणार असल्याचे घोषित केले. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सर्वांनी पहाटेच जायकवाडी जलाशयावरील पक्षी निरिक्षन केले. त्यानंतर विविध विषयावर सादरीकरण झाले.

नाशिक येथील डॉ.अनिल माळी,अमरावती येथील डॉ. गजानन वाघ, मुंबई येथील अविनाश कुबल, सांगली येथील शरद आपटे, अमरावती येथील प्रतिक चौधरी व कपिल दैवत, आदिनी विविध विषयावा सादरीकरण केले. याप्रसंगी ज्येष्ठ पक्षिमित्र दत्ता उगावकर, डॉ. सुधाकर कुऱ्हाडे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. युवराज सुडके, भाऊसाहेब अडसरे, डॉ. रवींद्र वैद्य, डॉ. उषा शेरखाने, प्रा. आशा वडणे, प्रा. अश्विनी गोरखे, प्रा. सचिन पवार, प्रा. मिनाक्षी चक्रे आदिची उपस्थिती होती. 

Leave a Reply