शेवगाव प्रतिनिधी, दि. २८ : नम्रता म्हणजे जीवनाच्या वाटेवरचा प्रकाश, जो माणसाला यशाच्या शिखराकडे घेऊन जातो.
यासाठीच माणसाच्या जीवनात नम्रता असणे फार महत्वाचे असल्याचे प्रतिपादन वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल महाराज वाळके यांनी केले.

वाळके महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील विविध उदाहरणे देऊन देव आणि देशभक्ती यांचे महत्त्व विशद केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनात अनेक संकटांचा सामना केला, परंतु त्यांनी कधीही आपली निष्ठा सोडली नाही. त्यांनी नेहमी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले आणि ते साध्य केले. श्री, संत बाळू मामा हे देखील एक महान संत होते. त्यांनी आपल्या जीवनात अनेक चमत्कार केले आणि लोकांना भक्तीचा मार्ग दाखवला. त्यांनी लोकांना नेहमी सत्य आणि न्यायाच्या मार्गावर चालण्याची शिकवण दिली.

यावेळी गोरख गाडेकर, विष्णू रुईकर, राजेंद्र लांडे, लक्ष्मण रुईकर, बप्पासाहेब लांडे, पोपट रुईकर, गोरख गावडे, दिलीप महाराज गायकवाड, गणेश म्हस्के, भारत लांडे, मारुती माळी, हरीहरी गावडे, बाबासाहेब वाकडे, शिवाजी भिसे, दिनकर सुडके, बबन गायकवाड, गोरक्षनाथ भिसे, अण्णासाहेब जाधव, जालिंदर गाडेकर, गणेश वाघ, रामदास भिसे, आसाराम भिसे, बाबासाहेब गाडे यांच्यासह गहिले वस्ती, सालवडगाव, माळेगांव, ठा, निमगाव येथील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
