कोपरगांव प्रतिनिधी, दि. ६ : गेल्या 31 वर्षापासून मुंबादेवी तरुण मंडळाने साईगाव पालखी सोहळ्याचे राम नवमी निमित्त आयोजन सुरू ठेवले असून या उत्सव काळाच्या ५३ दिवसात कोपरगांव शहरातील साई भक्तांकडे साईपादुका नेऊन घरोघर साई नामाचा मंत्रजागर व्रतातून यावर्षी तब्बल ९ कोटी ११ लाख ९९ हजार ९९ नामजप श्रीसाईबाबा शिर्डी चरणी अर्पण केला आहे.

श्री साईबाबा संस्थान शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी रामनवमीच्या निमित्ताने हा नाम जप स्विकारुन साईगांव पालखी आणि कोपरगांवकर धन्य असल्याचे म्हटले आहे. या नामजपातुन साई उर्जा साता- समुद्रापार अधिक फलदायी होऊन यातुन साई भक्तांच्या दैनंदिन अडचणींचे निराकरण निश्चित होईल. कोपरगांव पंचक्रोशीतील साईभक्त महिला पुरुष भाविक या संकल्पनेत ३१ वर्षाससुन सहभाग नोंदवत आहे आहेत.

मुंबादेवी तरुण मंडळ साईगाव पालखीचे वतीने या उपक्रमाची रामनवमीच्या मुहुर्तावर १९९४ पासुन सुरुवात करण्यांत आली. मुंबादेवी तरुण मंडळाचे सर्व साई सेवक दिमतीला पूर्वा जाधव, सार्थक निकुंभ, अवधुत उदावंत या सह अनेक साईभक्त बच्चे कंपनीने ५३ दिवस कोपरगावातील साईभक्तांकडे या साईपादुका व 53 अध्याय पोहोच करत भिक्षा झोळी फिरवत या उपक्रमाला आर्थिक सहाय्यतेची जोड उपलब्द करून दिली आहे. साध्वी अनुराधा पंढरपूरकर यांनी या अलौकिक उपक्रमाचे विशेष कौतुक केले आहे.
