जिल्हाधिकारी यांचे समोर शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यानी दाखवली एक दिवसाची तत्परता

जिल्हाधिकाऱ्यांनी दिवसभरात कोपरगाव तालुक्यातील सर्व कार्यालयांचा घेतला आढावा

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १८ : कोपरगाव मध्ये आज दिवसभर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी तळ ठोकून तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयातील प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत कामकाजाचा आढावा घेवून ते थेट कोपरगाव नगरपालीकेच्या कचरा डेपोवर जावून घनकचरा व्यवस्थापनाची पाणी केल्याने संपूर्ण पालीका प्रशासन खडबडून जागी झाली.

एक दिवस जिल्हाधिकारी तळठोकुन बसले तर सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचारी दक्ष होवून वेळेवर कामावर उपस्थित होते. अनेकांनी गळ्यात ओळखपत्र घालुन कामकाज करीत होते. आरोग्य यंञणा सतर्क होवुन जिल्हाधिकारी यांच्यासमोर उभी होती. हिच तत्परता दररोज दाखवली तर नागरीकांचे व देशाचे अधिक भले होईल यात शंकाच नाही.

 बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया हे कोपरगाव तालुक्याच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहीती समजताच सर्व शासकीय कार्यालये व तेथील अधिकारी, कर्मचारी खडबडून जागे होवून आपापल्या कार्यालयाची साफसफाईसह अनेक प्रकारची व्यवस्था करुन निट नेटकेपणा दाखवत होते. कोपरगाव नगरपालीकेच्या वतीने शहरातील अनेक भागात घनकचरा संकलन करण्यासाठी येणाऱ्या गाड्यांचे दिशादर्शक फलक व संकलित करण्याचे वेळापञकाचे फ्लेक्स लावून नागरीकांना नवा चमत्कार घडवला. 

 जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी कोपरगावमध्ये आल्या बरोबर तहसीलदार यांच्या दालनात सर्वप्रथम संबंधीत सर्व शासकीय विभागनिहाय आढावा घेवून त्यात्या विभागाच्या कामकाजाचा आढावा घेत जिल्हास्तरीय प्रलंबित प्रस्ताव तसेच इतर नागरीकांसाठींच्या योजना कशा राबविल्या पाहीजेत त्यात येणाऱ्या अडचणींवर योग्य मार्गदर्शन करीत योग्य त्या सुचना केल्या.

त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाला भेट देवून तेथील प्रत्यक्ष पहाणी केली. वैद्यकीय अधिक्षक डॉ. शिरीष बुट्टे, डॉ. अतिश काळे  व इतर वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संवाद साधुन अडचणी व सेवा समजून घेतल्या. तेथून जिल्हाधिकारी हे थेट अहिल्यानगरला जातील असे वाटत असताना ते  शहरातील काही गल्ली बोळात अचानक जावून थेट  शहरातील कापड बाजार परीसरातील व्यापारी व सर्वसामान्य नागरीकांशी संवाद साधत दररोज आपल्या घरातील कचरा घेण्यासाठी घंटागाडी वेळेवर येते का?अशी चौकशी केली.

नागरीकांचे सकारात्मक उत्तर ऐकताच ते तडक नगरपालीकेच्या मनाई येथील कचरा डेपोवर गेले. अतिशय दुर्गंधीयुक्त परिसर असल्याने जिल्हाधिकारी करा डेपो वरवर जावून  पहाणी  करतील असे वाटत नव्हते, पण त्यांनी थेट पायात सुरक्षा बुट घालुन संपूर्ण घनकचरा व्यवस्थापन प्रक्रीयेची  बारकाईने पहाणी केली.

यावेळी त्यांच्यासमवेत प्रांताधिकारी  माणिक आहेर, तहसीलदार महेश सावंत, मुख्याधिकारी सुहास जगताप, आरोग्य निरीक्षक सुनिल आरण यांचेसह अनेक अधिकारी होते. जिल्हाधिकारी यांनी खत प्रकल्पाची पहाणी  केली व इतर अडचणी जाणून घेत पालीका  प्रशासनाला अनेक सुचना केल्या. येत्या मार्च पर्यंत दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना देत अखेर परतीचा प्रवास केला. 

Leave a Reply