निती मुल्यांची शिकवण देणारे संजीवनी सैनिकी स्कूल – सुमित कोल्हे

कोपरगांव प्संरतिनिधी, दि. १९ : जीवनी सैनिकी स्कूलने मागील काही वर्षांपासून वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक किर्तिमान स्थापित केले असुन सर्वगुण संपन्न नागरीक घडवुन भविष्यात आपला विद्यार्थी देशाची, समाजाची आणि आपल्या कुटूंबाची कशा चांगल्या प्रकारे सेवा करू शकेल, या निती मुल्यांची शिकवण  देण्यासाठी तसेच आपला विद्यार्थी स्वावलंबी बनलाच पाहीजे, हे सर्व ध्येय डोळ्यासमोर ठेवुन विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्वाच्या आणि आधुनिक अभ्यासक्रमाच्या पैलुंचे रूजविण्याचे कार्य संजीवनी सैनिकी स्कूलमध्ये केले जाते, असे प्रतिपादन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी केले.

संजीवनी सैनिकी स्कूल आयोजीत इ.६ वी मध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विधार्थी व त्यांच्या पालकांच्या स्वागत कार्यक्रमात  श्री सुमित कोल्हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संचालक (नॉन अकॅडमिक) डी. एन. सांगळे, प्राचार्य कैलास दरेकर उपथित होते. यावेळी नव्याने प्रवेश  घेतलेले सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या  संख्येने उपस्थित होते. सर्व प्रथम सरस्वती देवी व स्व. शंकरराव  कोल्हे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर शालेय  बॅन्ड पथकाने देश  भक्तीपर गीत गात व सशस्त्र दलाने उभारलेल्या  कमानीमधुन सुमित कोल्हे यांनी पुष्प गुच्छ देत विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

कोल्हे पुुढे म्हणाले की, स्व. शंकरराव  कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली  संस्थेचे अध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे व मॅनेजिंग  ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी घालुन दिलेली शैक्षणिक  आचार संहिता आम्ही काटेाकोर पाळत असुन त्याचे उत्तम रिझल्ट आम्हाला मिळत आहे. आपल्या पाल्यांचे उज्वल भविष्य  घडविण्यासाठी संस्थेने इ. ६ वी पासुन एनडीए, जेईई, एनईईटी अशा  स्पर्धात्मक परीक्षांचे फाऊंडेशन कोर्सेस सुरू केले आहेत. तसेच आपले आपले पाल्य सुरक्षित असल्याचे  आश्वासित  केले. डी. एन. सांगळे यांनी विद्यार्थ्यांसाठी  भविष्यातील  संधी व संस्थेचे  विविध मानस स्पष्ट  केले. प्राचार्य दरेकर यांनी शाळेची  नियमावली स्पष्ट  केली.


 

Leave a Reply