जेऊर कुंभारी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचा नूतन नामकरण समारंभ संपन्न
कोपरगाव प्रतिनिधी, दि. १९ : येथील जेऊर कुंभारी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित या संस्थेच्या नव्या वास्तूचा नूतन नामकरण समारंभ सोहळा संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या शुभहस्ते पार पडला. संस्थेच्या नव्या इमारतीला यादवराव शिवराम वक्ते जेऊर कुंभारी विविध सेवा सहकारी संस्था मर्यादित जेऊर कुंभारी ता.कोपरगाव असे गौरवपूर्ण नाव देण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश मंदिरात नारळ वाढवून झाली. त्यानंतर नामफलकाचे उद्घाटन, सत्कार समारंभ अशा विविध टप्प्यांमध्ये कार्यक्रम पार पडला.

बिपीनदादा कोल्हे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “सहकार टिकवणे ही काळाची गरज आहे. संस्था सुरू करणे सोपे असले तरी ती यशस्वीरित्या चालवणे आणि टिकवणे हे अधिक कठीण आणि जबाबदारीचे काम असते. व्यवस्थापनावर सतत लक्ष ठेवणे गरजेचे असते, अन्यथा अनेक संस्था दुर्लक्षामुळे मोडकळीस येतात. ग्रामीण भागात अशा संस्था हा अर्थकारणाचा दुवा आहेत आणि त्या टिकवण्यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे.”

या संस्थेची स्थापना दिनांक ०५/०६/१९५० रोजी कै. फक्कडराव लक्ष्मणराव आव्हाड यांनी केली होती. तर यादवराव शिवराम वक्ते यांनी संस्थेला पाच गुंठे जागा विनामूल्य प्रदान केली. संस्थेमार्फत दरवर्षी सभासदांना ५ ते ७ टक्के डिव्हिडंटही वाटप केला जातो.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यू इंडिया इन्शुरन्सचे मॅनेजर भिमराज मच्छिंद्र वक्ते होते.

बिपीनदादा कोल्हे यांनी संस्थेच्या आजवरच्या सर्व संचालक मंडळाचे मन:पूर्वक अभिनंदन केले आणि त्यांचं पारदर्शक व प्रेरणादायी कार्य कौतुकास्पद असल्याचे नमूद केले.

या प्रसंगी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना व्हाईस चेअरमन राजेंद्रजी कोळपे, संचालक विश्वासराव महाले, संचालक बाळासाहेब वक्ते, संचालक ज्ञानेश्वर होन, अरुणराव येवले, संजय होन, संचालक सतीशराव आव्हाड, संभाजीराव गावंड, विजयराव रोहम, शिवाजीराव वक्ते, दीपकराव गायकवाड, मधुकरराव वक्ते, विठ्ठलराव आव्हाड, रामभाऊ आव्हाड, रमेशराव वक्ते, तुळशीदास पगारे, संजय वक्ते, जालिंदर चव्हाण, यशवंतराव आव्हाड, शिवाजीराव यादवराव वक्ते, कैलासराव वक्ते, सखाहरी वक्ते,

आण्णासाहेब चव्हाण,अशोकराव राऊत, सखाहरी चव्हाण,विजयराव गिरमे,सोसायटी चेअरमन कोंडीराम वक्ते, व्हा. चेअरमन वैशाली शिंदे व सर्व संचालक मंडळ,किरण वक्ते, विजय मधुकरराव वक्ते, आप्पासो चव्हाण, काकासाहेब तुकाराम वक्ते, इंद्रभान वक्ते, किसनराव वक्ते, पांडुरंग धोंडीराम वक्ते, सुरेश पगारे, प्रभाकर अंबिलवादे, नितीन इंगळे, नवनाथ गायकवाड, भाऊसाहेब मोहन वक्ते, पूर्वा रामचंद्र वक्ते, धोंडीराम संपत वक्ते, सखा तात्या चव्हाण, दादासो सखाराम चव्हाण आदी मान्यवर, गावातील कार्यकर्ते तसेच सोसायटी संचालक उपस्थित होते. आभार शिवराजीराव वक्ते यांनी मानले.
