कोपरगांव प्रतिनिधी, दि. ३० : प्रत्येक पालकाची या महाकाय विश्वातील सर्वात मौल्यवान संपत्ती असते ती म्हणजे त्यांची संतती. आपले पाल्ये या महाकाय विश्वातील स्पर्धेत स्थिर स्थावर व्हावे, ते स्वावलंबी बनावे, म्हणुन मोठ्या विश्वासाने संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये शिक्षणासाठी दाखल करातात.

या विश्वासाला आधिन राहुन संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजचा ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभाग वेगवेगळ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी संपर्क साधुन आपल्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळवुन देण्यासाठी कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करतो. अशाच प्रयत्नातुन विप्रो परी या बहुराष्ट्रीय कंपनीने संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या अंतिम वर्षातील १४ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी आकर्षक पगारावर निवड केली आहे. अशा प्रकारे संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या देवुन पालकांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत आहे, अशी माहिती संजीवनी महाविद्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

विप्रो परी (प्रिसिझन ऑटोमेशन अँड रोबोटिक्स इंडिया) या बहुराष्ट्रीय कंपनीने संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या अंतिम वर्षातील सहा, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या तीन, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगच्या दोन व मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरींगच्या तीन विद्यार्थ्यांची त्यांच्या अंतिम निकाला अगोदरच नोकरीसाठी निवड केली आहे.

यात जीवन तुकाराम आहेर, हर्षद संजय गाडे, प्रसन्ना वाल्मिक गोसावी, स्वरूप सतीश कुऱ्हे , गणेश सुरेश साबळे, प्रथमेश प्रविण वाडेकर, आश्रय सुनिल दिवान, स्नेहा महेश पवार, गौरव नारायण शेळके, प्राजक्ता जालिंदर दहातोंडे, विशाल दत्तात्रय पुंड, मयुर राऊसाहेब दिवटे, पंकज संजय निर्गुडे व नम्रता नानासाहेब रक्ताटे यांचा समावेश आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे की ग्रामीण भागातील मुला मुलींना नोकरीच्या संधी मिळाव्यात, काहींनी उद्योजक बनावे, या हेतुने माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी १९८३ साली संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजची स्थापना केली. त्यांचा हेतु सफल होत आहे. कारण आज पावेतो हजारो अभियंते देश परदेशात कार्यरत आहे तर काही नामांकित उद्योजक बनले. यामुळे ग्रामीण अर्थ कारणाला बळकटी मिळाली आहे.
संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे.
