केबीपी विद्यालयात युथ डेव्हलपमेंट अंतर्गत विद्यार्थ्यांना करिअर गाईडन्स मार्गदर्शन

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ४ : रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालयात रयत गुरुकुल प्रकल्प अंतर्गतयुथ डेव्हलपमेंट कार्यक्रम विद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष पद्मकांतभाऊ कुदळे यांनी भूषवले, तर प्रमुख वक्ते निनाद ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

त्यांनी आपल्या जीवनातील अनुभव कथन करत आत्मविश्वास, योग्य तयारी आणि करिअर निवडीसंबंधी दिशा दिली. संवादात्मक शैलीत विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान करत निर्णयक्षमता व मनोबल कसे वाढवावे, याविषयी मार्गदर्शन केले. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक  लव्हाटे सर यांनी  विद्यार्थ्यांना करिअर गाईडन्स विषयी बहुमोल मार्गदर्शन केले

 कार्यक्रमास सौ. स्मिताताई कुदळे, दिनार कुदळे, उपमुख्याध्यापक बी. के. कोल्हे पर्यवेक्षिका श्रीमती के. एफ. जगताप तसेच प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी लंकेयांचीही उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना दिनेश चव्हाण यांनी  केली आभार प्रदर्शन बी. आर. जाधव  यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply