कोपरगाव प्रतिनिधी, दि. ५ : स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात महिला तक्रार निवारण समिती व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष विभागाच्या संयुक्त विद्यमाने दि.०३ जानेवारी रोजी ‘तांत्रिक कौशल्य प्रशिक्षण’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे उद्घाटन ए.आय.एफ.चे समुपदेशक डॉ. विश्वास केदारी, समुपदेशिका मिस.के.विपुलता, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त मा. संदिपराव रोहमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, महिला तक्रार निवारण समितीचे प्रमुख डॉ. सुरेखा भिंगारदिवे, प्रो. (डॉ) विजय ठाणगे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी ए.आय.एफ.चे समुपदेशक डॉ. विश्वास केदारी यांनी महिला तक्रार निवारण समितीचा उद्देश्य नमुद करतांनाच सशक्तीकरण झालेली महिला ही कधीच अशक्त नव्हती, कारण महिला संगोपन करण्याची जबाबदारी ती सक्षमपणे पार पाडत असते. यासाठी आवश्यक असणारे अनेक गुण हे महिलांना नैसर्गिकरित्या मिळालेले असतात. विविध कौशल्य आत्मसात करून परिवाराबरोबरच समाजात खंबीरपणे उभे राहण्याची क्षमता महिलांमध्ये असते. आपल्याकडे असलेल्या सुप्त गुणांना वाव देऊन आज महिलांनी देश- विदेशात आपल्या कार्याचा ठसा उमटविल्याचे ही त्यांनी नमुद केले.
यावेळी ए.आय.एफ.च्या समुपदेशिका मिस.के.विपुलता यांनी आपल्या मनोगतात महिलांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने राबविलेल्या विविध उपाय योजनांचा उल्लेख केला. तसेच महिलांमध्ये निर्णयक्षमता विकसित करण्याबरोबरच स्त्री अस्मितेसाठी अशा कार्यशाळेची आवश्यकता असल्याचे नमुद केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस. यादव यांनी महिला तक्रार निवारण समितीचे कार्य व कर्तव्य अधोरेखित करतांनाच कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारीची दखल घेण्याचे काम सर्वप्रथम अंतर्गत तक्रार निवारण समिती करत असते असे नमुद केले.
महाविद्यालयातील विद्यार्थीनीच्या सुरक्षितेसाठी समितीच्या वतीने राबवित असलेल्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. या कार्यशाळेचे प्रास्ताविक समितीच्या प्रमुख डॉ. सुरेखा भिंगारदिवे यांनी तर पाहुण्याचा परिचय डॉ. एस.के.बनसोडे यांनी करुन दिला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रज्ञा कडु यांनी तर आभार समितीच्या सदस्या प्रा. वर्षा आहेर यांनी मानले. यावेळी प्रो.(डॉ.) एस.आर.पगारे, रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे, प्रा. नीता शिंदे, डॉ. एस. जी. कोंडा, डॉ. आर. ए. जाधव हे उपस्थित होते.