दिर्घायुरारोग्यासाठी योग विश्वासाठी अदभूत भेट – पुष्पाताई काळे

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : शारीरीक व्याधींपासून मुक्ती, मनःशांती, चिंतामुक्त जगण्याची समृद्धता योगामुळे सहज शक्य असून कोणत्याही परिस्थितीत व्यक्तीचे मन नेहमी संतुलित ठेवण्याची ताकद योगामध्ये असून दिर्घायुरारोग्यासाठी योग विश्वासाठी अदभूत भेट असल्याचे प्रतिपादन प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांनी केले आहे.

Mypage

नवरात्रौत्सवानिमित्त दरवर्षी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असून याहीवर्षी कोपरगाव येथे ‘शास्त्रोक्त योग उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचे उदघाटन नुकतेच मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी त्या बोलत होत्या.

Mypage

त्या पुढे म्हणाल्या की, धावपळीच्या युगात योग साधना अत्यंत महत्त्वाची असून योग साधनेतून जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याचा दृष्टिकोन वृद्धींगत होतो. शरीरातील व्याधी दूर करून निरोगी, उत्साही जीवनासाठी योग महत्त्वपूर्ण आहे. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या निरोगी राहण्यासाठी योग साधना वरदान असून दिवसभरात स्वत:साठी एक तास योग साधनेला द्यावा त्यामुळे प्रत्येकाला दिर्घायुरारोग्य लाभणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Mypage

यावेळी योग प्रशिक्षक अभिजित शहा सर, वैभवी मखिजा, उत्तमभाई शहा, माजी नगरसेविका सौ.प्रतिभा शिलेदार, सौ.स्वप्नजा वाबळे, सौ.पुनमताई विसपुते, सौ.सीमा पानगव्हाणे, सौ.सुनिता खैरनार, सौ.नेत्रा कुलकर्णी, सौ.रुपाली भोकरे, सौ.रत्नप्रभा पाठक, सौ.मंदाकिनी बारे, सौ.राणी कुलथे, सौ.अलका भावसार आदींसह महिला उपस्थित होत्या.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *