कोपरगाव प्रतिनिधी, दि. ४ : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची प्रदेश पातळीवरील लोकसभा व विधानसभा निवडणुक दरम्यान रिक्त झालेल्या पक्ष पदाधिकारी पदाची निवड करण्यासंदर्भाने गेल्या गुरुवारी दिनांक २६/६/२०२५ रोजी मुंबई येथील टिळक भवनात आढावा बैठक घेण्यात आली, सदर बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी चे काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात, संंदीपकुमार, ॲड. गणेश पाटील, मोहन जोशी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील संघटना बळकट करण्यासाठी रिक्त जागांच्या संदर्भाने पदे भरण्याच्या निर्णय घेण्यात आला, तसेच महा विकास आघाडी सत्तेत असताना व सत्तेबाहेर असताना संधीसाधू पदाधिकारी यांनी केलेले पक्षांतर बाबतीत ही चर्चा झाली.

ह्या पुर्वी २०१९ साली माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असताना नितीन मनोहर शिंदे यांची प्रथम निवड कोपरगांव काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. मुबंई येथील मुलाखती दरम्यान त्या काळातील अनेक आंदोलन पैकी कोपरगांव तालुक्यातील विद्युत पुरवठा सुरळीत करणे कामी, वनविभागाचे ऑफिस तहसील कार्यालयात शिफ्टींग, तालुक्यातील रस्ते,ओला दुष्काळ अनुदान मिळण्यासाठी आंदोलन, शेतीसाठी पाट पाणी मिळणेबाबतच्या आंदोलनाची नोंद घेण्यात आली.

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील नितीन शिंदे यांची पुन्हा तालुकाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. गेले काही वर्षापासून धर्मदाय आयुक्त कार्यालय अहमदनगर व पुणे तसेच उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर येथे कोपरगाव काँग्रेस कमिटीचे मालकीचे कोपरगांव शहर मेन रोडवरील काँग्रेस भवन ट्रस्टचे न्यायालयीन लढाई व तसेच येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका गेल्या लोकसभा व विधानसभेच्या वेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची बाजू समर्थपणे सातत्याने मांडण्यात आली असल्याने नितीन शिंदे पुन्हा तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांंना देण्यात आलेली आहे.

सध्याचे केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती, शेती मालाला योग्य बाजार भाव बाबतीत निर्णय घेत नसल्यामुळे शेतकरी, बेरोजगारी मुळे तरुण व कामगारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनानुसार आणि इतर वरिष्ठांच्या सूचनेनुसार संपूर्ण तालुका व जिल्हातील निवडणूक तयारीचा कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाईल. कोपरगाव नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायती यासह सर्वच निवडणुकांमध्ये काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी सहभागी होणार आहे.

ते पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्षाचा इतिहास समृद्ध आहे. राहुल गांधी यांचे कार्य व विचार हे युवकांना प्रेरणा देणारे ठरत आहेत. काँग्रेसने ग्रामीण भागात विकासाच्या अनेक योजना राबवल्या, गरिबांसाठी घरे, रोजगार, तसेच शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती सारखे महत्वाचे निर्णय पुर्वी घेतलेले आहेत. त्यामुळे जनतेचा विश्वास काँग्रेसवर पुर्ण आहे.”

पदनियुक्तीच्या वेळी अहिल्यानगर काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत वाघ शहराध्यक्ष तुषार पोटे, विष्णु पाटील पाडेकर, विजय सुधाकर जाधव, ज्ञानेश्वर भगत, रौणक अजमेरे, ॲड. शितलताई देशमुख,सौ.पुष्पाताई भगत, शब्बीरभाई शेख, छोटू भाई पठाण ,सोपान धैनक, सोमनाथ पगारे, श्रीजय चांदगुडे, कैलास भाऊ पंडोरे पैलवान, निलेश चांदगुडे, मझर शेख, चंद्रहार जगताप, रवींद्र साबळेसर, राजू भाई व अब्बास पठाण, ज्ञानेश्वर निकम, दिलीपराव औताडे, नंदकुमार शिवरकर, सचिन होन, विलास गगे, विलास जाधव व इतर अनेक यांनी नियुक्ती बद्दल अभिनंदन केले व पुन्हा पक्षाला मुख्य प्रवाहात आणून काँग्रेसला अधिक बळकट करण्यासाठी यापुढील काळात थोरात यांच्या नेतृत्वाखाली अधिक सक्रियतेने आणि जोमाने काम करून तालुका व जिल्ह्यात काँग्रेस पक्ष पुन्हा प्रथम क्रमांकावर नेऊ. काँग्रेसचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष नितीन शिंदे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभारही मानले.
