कोपरगाव प्रतिनिधी, दि. ६ : सर्वत्र भक्तिभावाने साजऱ्या होणाऱ्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने कोपरगाव शहरात पर्यावरण पूरक उपक्रम राबवून भक्ती आणि पर्यावरण यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पार्टी, कोपरगाव शहराच्यावतीने माजी आमदार मा. सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते पवित्र तुळशी रोपांचे वाटप व प्रसाद वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. युवानेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतानाच भक्तीभाव जागवणारा हा उपक्रम असल्याने भाविकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

विठ्ठल भक्ती ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा प्राण आहे. ‘माझे माहेर पंढरी’ म्हणत लाखो वारकरी दरवर्षी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे पायी चालत जातात. ही वारी म्हणजे फक्त श्रद्धेचा प्रवास नसून ती सामाजिक ऐक्य, समानता आणि भक्तीमय एकतेचे प्रतीक आहे. जात, पंथ, भाषा या पलीकडे जाऊन सर्वांना एकत्र बांधणारा हा चालता चालता घडणारा धर्ममेळा ही एक अनोखी संस्कृतीच आहे. कोपरगावमध्ये राबवलेला तुळशीवाटप उपक्रम हीच वारकरी भावनेची आणि पर्यावरणप्रेमाची आधुनिक अभिव्यक्ती आहे या प्रकाराची भावना व्यक्त करत स्नेहलताताई कोल्हे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

दरवर्षीप्रमाणे राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरला पायी दिंडीतून विठुरायाच्या दर्शनासाठी जात असताना, कोपरगावमध्येही एकादशीचे औचित्य साधून सामाजिक भान जपत भक्तिभावाने हा पवित्र दिवस साजरा करण्यात आला याचे सर्वांनी कौतुक केले.

या प्रसंगी विद्या सोनवणे, शिल्पा रोहमारे, अनिता गाडे, दीपा गिरमे, सुवर्ण सोनवणे, योगिता आढाव, वैशाली आढाव, अच्युता बागुल, दिपाली आघाडे, भाजपा शहराध्यक्ष वैभव आढाव, राजेंद्र सोनवणे, रवींद्र पाठक, नारायण शेठ अग्रवाल, हाजी नसीरभाई सय्यद, दिलीपराव मंजुळ, विवेक सोनवणे, प्रशांत कडू, कैलास खैरे, विनोद नाईकवाडे, जयप्रकाश आव्हाड, सचिन सावंत, सोमनाथ म्हस्के, गोपीनाथ गायकवाड, अकबरलाला शेख, रवींद्र लचुरे, चंद्रकांत वाघमारे, सुशांत खैरे, विजय चव्हाणके, रामदास साळुंखे, हुसेनभाई सय्यद, फकीर मामू पैलवान, संजय खरोटे यांच्यासह भारतीय जनता पार्टी पदाधिकारी,मित्र फाउंडेशन कोपरगावचे सर्व सदस्य उपस्थित होते.
