कोपरगाव प्रतिनिधी दि. ८ : कोपरगाव शहर व तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी बघ्याच्या भूमिकेत आहेत की काय अशी शंका सर्वसामान्य नागरीकांना येत आहे. कोपरगाव शहरात सोमवारी दिवसाढवळ्या घर फोडून तीन तोळे सोन्याचा ऐवज घेवून चोरटे पसार झाले. अत्यांत रहदारी व जागरुक असलेला साईनगर हा भाग असुन येथील आप्पासाहेब शिंदे यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटाची उचकापाचक करुन आडीज ते तीन तोळे सोने चोरट्यांनी दिवसा चोरल्याची घटना घडली.

पोलीसांचा जोरावर धाक नसल्याचे यावरून दिसुन येते. आप्पासाहेब शिंदे हे सोमवारी दुपारी १२ वाजता आपल्या कुटूंबासह. एका कार्यक्रमासाठी गेले होते तो कार्यक्रम आटपून केवळ दोन तासात परत आले माञ इतक्या कमी वेळेत चोरट्यांनी घर फोडून दिवसा चोरी करण्याचे धाडस केले. केवळ पोलीसांचा वचक नसल्याचे चोरांनी दिवसाढवळ्या चोरी करुन सिध्द केले.

दरम्यान जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी अहिल्या नगर जिल्ह्यातील अवैध धंदेवाईकावर. कारवाई करण्यासाठी विशेष पोलीस पथकाची निर्मीती केली असुन त्या पथकात धडाकेबाज कारवाई करणारे परिविक्षाधीन पोलीस उपाधिक्षक संतोष खाडे यांची नियुक्ती केली. पोलीस उपाधिक्षक संतोष खाडे यांनी कोपरगाव सज्ञ जिल्ह्यातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांची झोप उडवली माञ चोऱ्या करणाऱ्यांनी दिवसा चोऱ्या , घरफोड्या करुन नागरीकांची झोप उडवली.

पोलीसांना आव्हान देण्याचे काम चोरांनी केले आहे स्थानिक पोलीस केवळ बघ्यांच्या भूमिकेत आहेत की काय ?. गेल्या आठवड्यात पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने शहरासह तालुक्यातील अवैध व्यवसाय करणाऱ्यावर धाडी टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करीत अनेकांवर गुन्हे दाखल केले माञ स्थानिक पोलीसांना हे का दिसले नाही.

कित्येक दिवसांपासून चालु असलेले अवैध व्यवसाय या पुर्वी का बंद करता आले नाही. कोणाच्या बळावर हे अवैध व्यवसाय चालु होते. आता दिवसा घरफोड्या सुरु आहेत यावर पोलीस वचक ठेवणार का ? याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.
