गुरुपौर्णिमा म्हणजे सद्गुरूप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा  –  संत परमानंद महाराज

 कोपरगाव प्रतिनिधी दि. ८ :  प्रत्येक श्रद्धाळू भाविकांचा अंतकरणातील भाव श्री गुरूंच्या चरणी समर्पित करत करत ज्या गुरुदेवांच्या असीम कृपेने जिवंत करण्याची खऱ्या अर्थाने जीवनशैली मिळाली मूळ स्वभावात अर्थात स्वस्वरूपाच्या संशोधनाकडे प्रत्येक जीव सन्मुख झाला आणि माणूस म्हणून जगू लागला अशा प्रत्येकांना श्री गुरुदेवाच्या चरणी आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा जो सोहळा आहे तो म्हणजे गुरु पौर्णिमेचा सोहळा होय.

सद्गुरू पौर्णिमा साजरा करण्याचा संकल्प आत्मा मालिक ध्यानपिठात भाविकांनी केला आहे. अशा वैश्विक उत्सवाला येण्याचे आवाहन ध्यान पिठाचे अध्यक्ष संत परमानंद महाराज यांनी केले आहे.  विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट व आत्मा मालिक ज्ञानपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे आश्रमात गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ज्ञानपीठाचे अध्यक्ष संत परमानंद महाराज यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती दिली.

यावेळी  आत्मा मालिक ज्ञानपीठाचे अध्यक्ष संत परमानंद महाराज यांच्या समवेत संत विवेकानंद महाराज, संत निजानंद महाराज, संत विश्वानंद महाराज , संत राजनंद महाराज, संत विवेकानंद महाराज, संत सर्वेश्वरानंद महाराज ,संत गणुदास महाराज, संत चंद्रानंद महाराज, आश्रमाचे सचिव हनुमंत भोंगळे,विश्वस्त आबासाहेब थोरात, बाळासाहेब गोर्डे, भगवानराव दौंड, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 यावेळी संत परमानंद महाराज पुढे म्हणाले की, प्रत्येक जीवाच्या हृदयात विराजमान असणाऱ्या सद्गुरूंची पौर्णिमा म्हणजेच आत्मा मालिक गुरुपौर्णिमा हा उत्सव साजरा करण्यासाठी राज्यसह देश विदेशातील लाखो भाविक उपस्थित राहणार आहेत. ८  ते १०  जुलै या दरम्यान तीनदिवशीय गुरुपौर्णिमा उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना मोफत राहण्याची, भोजनाची व इतर अनेक सुविधा केल्या आहेत. तब्बल ५० हजार स्क्वेअर फुटांचा सत्संग मंडप उभारला आहे. जिलेबी सह विविध पंचपक्वान्नाचा महाप्रसाद २४  तीन दिवस सुरु असणार आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी दर्शन घेणाऱ्या भाविकांना ५१ पोते बुंदीचा  प्रसाद वाटप करण्याची व्यवस्था केली आहे.

 आश्रमातील मुख्य मंदीरात श्री आत्मस्वरूप सद्गुरूंच्या पादुकांच्या अभिषेक ध्वज पूजन काकड आरती, भजन सह विविध प्रवचनकार, किर्तनकार आपली सेवा देणार आहेत. राज्यासह सौराष्ट्र गुजरात येथील  सत्संग मंडळाच्यावतीने अन्नछत्र सेवा करण्यासाठी शेकडे  भावीक आले आहेत.

 आश्रमातील हजारो शाळकरी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक, विभागप्रमुख आपली सेवा देवून सद्गुरू माऊलीचे दर्शन घेणार आहेत. हा वैश्विक गुरुपौर्णिमेच्या सोहळ्याची जय्यत तयारी ध्यान पिठाच्या वतीने केली आहे संपूर्ण आश्रम विद्युत रोषणाईने तेजोमय झाले आहे.ह्या सोहळ्याला  कोकमठाण ग्रामस्थांसह विविध गावातील सत्संग मंडळे आपली सेवा देवून सद्गुरू माऊलींच्या सेवेचा लाभ घेत आहेत.

 ज्या ज्या जीव आत्म्याचा अंतर्यामी निर्गुण निराकार सद्गुरूंचा वास आहे अशा प्रत्येकांचा हा गुरुपौर्णिमा उत्सव आहे प्रत्येक सद्गुरूंच्या चरणी समर्पित गुरुमुखी भक्त आपापल्या गुरुस्थानावरती हा सोहळा साजरा करण्यासाठी जात असतो. अखिल विश्वाचा सद्गुरु हा निर्गुण रूपाने तुमच्या माझ्यात हृदयस्त विराजित आहे त्याचं नाव आहे आत्मा अशा या समस्त जीवांच्या मूळ स्वरूपाचा अर्थात आत्म्याचा हा उत्सव आहे या पवित्र आत्मा मालिक पिठावरती आत्मा मालिक सद्गुरु पौर्णिमा उत्सव साजरी होते.

 याच परंपरेप्रमाणे विश्वात्मक गुरुदेव आत्मा मालिक धानपिठात हा उत्सव मोठ्या भक्ती भावाने देश विदेशातील भावीक साजरा करण्यासाठी येत असतात. येथील गुरु पौर्णिमा उत्सव म्हणजे आत्म्याचा संदेश देण्याचं अविरत व्यासपीठ या धर्म मंडपात अखंड चालू राहणार आहे.  तेव्हा सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन शेवटी संत परमानंद महाराज यांनी केले.  यावेळी संत विवेकानंद महाराज विश्वस्त बाळासाहेब गोर्डे, भगवानराव दौंड, हनुमंत भोंगळे, यांनी कार्यक्रमाची रुपरेषा व उत्सवाची सविस्तर माहीती दिली.

Leave a Reply