कोपरगांव प्रतिनिधी, दि. ८ : दरवर्षी भारतामध्ये अमेरिकेच्या वतीने मेजर लीग बेसबाॅल (एमएलबी) ही स्पर्धा घेण्यात येते. भारतातील अनेक राज्य या स्पर्धेत सहभाग नोंदवितात. यावर्षी संजीवनी अकॅडमी, कोपरगांव व संजीवनी इंटरनॅशल स्कूल, शिर्डीच्या १३ वर्षे वयोगटांतर्गत खेळाडूंनी अहिल्यानगर संघाचे प्रतिनिधित्व करत बेंगळूर येथिल द्रविड पदुकोन एक्सलंस सेंटर येथे झालेल्या एमएलबी इंडिया कप २०२५ च्या राष्ट्रीय स्पर्धेत विजेते पद पटकावुन संजीवनी शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच क्रीडा क्षेत्रातही अग्रेसर असल्याचे सिध्द केले, अशी माहिती संजीवनी स्कूल्सच्या वतीने पत्रकाद्वारे दिली आहे.

या राष्ट्रीय स्पर्धेत एकुण १५० हुन अधिक संघांनी सहभाग नोंदविला. शेवटी चार संघ अंतिम फेरीत पोहचले. या चार संघातुन संजीवनीच्या खेळाडूंनी अहिल्यानगर संघाचे प्रतिनिधित्व करत अंतिम विजेते पद जिंकुन देशात एमएलबी मध्ये अव्वल असल्याची मोहर उमटवली. यात पार्थ भाऊराव गांगुर्डे, श्रीजय निखिल बोरावके, अद्वैत अच्युत फोपसेे, अर्जुन विजय वडांगळे, शाश्वत समरेंद्र कुमार, विराट अनिल पवार, संजयकुमार सरोज नाईक, गिरीराज संदीप गाडे, विराट अभय देशमुख, वीरल जयप्रकाश करवा, आराध्या योगेश परजणे, श्लोक सचिन जाधव या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

संजीवनीच्या या राष्ट्रीय यशाबद्धल संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, स्कुलच्या संचालिका डाॅ. मनाली कोल्हे यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. या खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक विरूपक्ष रेड्डी व मुस्तकीम पिरजादे यांचे मार्गदर्शन लाभले. डाॅ. मनाली कोल्हे यांनी संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या सहभागी खेळाडूंचा सत्कार केला. यावेळी प्रिन्सिपल डायरेक्टर सुधा सुब्रमण्यम, प्राचार्या रीना रजपुत, हेडमिस्ट्रेस रेखा साळूंके उपस्थित होते.
