दूध व्यवसायामुळे मार्केटमध्ये पत तयार होते – रमेशगिरी महाराज

औताडे सोसायटीचे दूध संकलन केंद्र सुरू

 कोपरगाव प्रतिनिधी, दि.१७ : पोहेगांवची बाजारपेठ मोठी आहे. परिसरात शेतकरी वर्ग जास्त असल्याने शेती पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसायाकडे शेतकरी वळाले आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी एक पाऊल पुढे येऊन श्री चांगदेवराव गणपतराव औताडे पा. विविध कार्यकारी सेवा सोसायटी संचालित वसुबारस ऍग्रो प्रोसेसिंग प्रोडूसर कंपनी च्या माध्यमातून दूध संकलन केंद्राची सुरुवात झाली आहे. दुधाला योग्य भाव व खाद्याच्या दरात देखील पारदर्शक व्यवहार होणार आहे.निश्चितच पोहेगाव परिसरासाठी ही अभिमानाची आहे.

दूध व्यवसायामुळे मार्केटमध्ये पत निर्माण होते असे प्रतिपादन जनार्दन स्वामी आश्रमाचे महंत रमेशगिरी महाराज यांनी केले. ते कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे वसुबारस दूध संकलन केंद्राची सुरुवात करताना बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे मार्गदर्शक शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे होते.

यावेळी स्वाध्वी शारदानंद गिरीजी माताजी, पवार महाराज, कोपरगाव बाजार समितीचे संचालक अशोकराव नवले, कोल्हे कारखान्याचे संचालक अशोक औताडे, उपसरपंच अमोल औताडे, माजी उपसरपंच प्रशांत रोहमारे, पोहेगाव पतसंस्थेचे अध्यक्ष दादासाहेब औताडे, रमेश झांबरे, शशिकांत लांडगे, निवृत्ती औताडे, संस्थेचे अध्यक्ष रवींद्र औताडे, उपाध्यक्ष अशोक वाके, संचालक सुनिल बोठे, अनिल औताडे,  दिलीप  औताडे, संजय औताडे, कैलास औताडे, अनिल औताडे, सुनिल  हाडके, गोकुळ लांडगे,सोमनाथ सोनवणे,नितीन भालेराव , सचिव गोरक्षनाथ फटांगरे अदी उपस्थित होते.

संस्थेचे मार्गदर्शक नितिनराव औताडे यांनी सांगितले की, दूध व्यवसायामध्ये भरभराटी व्हावी म्हणून याआधीही पोहेगाव पतसंस्थेच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांना आधार दिला आहे. आजही दूध उत्पादकांना केवळ प्रोत्साहनापर 12 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणार आहे. दूध उत्पादकांना न्याय देण्यासाठी इतरांपेक्षा अधिकचा भाव व खाद्य माफक दरात देण्याचा मानस सोसायटीचा आहे असे त्यांनी सांगितले.शारदानंदगिरी माताजी यांनी ही संस्थेचा दूध संकलन केंद्राचा उद्देश सफल होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्वागत दिलीप औताडे यांनी केले तर आभार संजय औताडे यांनी मानले.

Leave a Reply