कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३ : के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबीराचे उद्घाटन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. गुरूवार दि. २ जानेवारी ते बुधवार दिंनाक ८ जानेवारी २०२५ या कालावधीत संपन्न होत असलेल्या या शिबिरात डाऊच ब्रु. या गावात विविध विकासकामे करण्यात येणार आहे.
![](http://eloksanvad.com/wp-content/uploads/2025/01/samata-ek-hajar-koti-e1735742640142.jpg)
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये श्रम संस्कार रुजविणे तसेच ग्राम संस्कृतीचा विकास करणे या उद्देशाने आयोजित शिबीराचे उद्घाटन कोपरगाव शहरचे पोलिस निरिक्षक भगवान मथुरे साहेब, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, विश्वस्त मा. सुधीर डागा, संदिप रोहमारे, प्राचार्य प्रो. विजय ठाणगे, ग्रामपंचायत डाऊच ब्रु. चे सरपंच दिनेश गायकवाड, उपसरपंच सौ. उषा ढमाले, माजी उपसरपंच व जेष्ठ नागरिक भिवराव दहे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
![](http://eloksanvad.com/wp-content/uploads/2020/10/sona-poly.png)
या उद्धाटकीय मनोगतात मा. भगवान मथुरे साहेब यांनी श्रमसंस्काराचे महत्त्व नमुद करतानांच सायबर सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था यावर सखोल मार्गदर्शन केले. राष्ट्रनिर्मितीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या युवापिढीने नैतिकतेची कास पकडुन विकसनशिल देश घडविण्यात योगदान देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
![](http://eloksanvad.com/wp-content/uploads/2024/01/JYOTI-2024-e1704294196209.jpg)
अध्यक्षीय मनोगतात कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे यांनी दरवर्षी या श्रमसंस्कार शिबीराच्या माध्यमातून गाव पातळीवर होत असलेल्या कामाचे कौतुक करतांनाच डाऊच ब्रु. गावाच्या सर्वांगिण विकासासाठी महाविद्यालय सदैव कटिबध्द असल्याचे सांगितले. या गावाच्या भविष्यकालीन विकासासाठी नागरिकांच्या जनजागृतीची व सहकार्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
![](http://eloksanvad.com/wp-content/uploads/2020/10/sanjivani.png)
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. विजय ठाणगे यांनी स्वागत मनोगतात मागील तीन वर्षात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांनी केलेले काम इतर गावांसाठी दिशादर्शक ठरत असल्याचे सांगितले. या गावातील नागरिकांचा विकसनशील दृष्टिकोण बघुन पुढील दोन वर्षासाठी डाऊच ब्रु. हेच गाव शिबिरासाठी निवडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
![](http://eloksanvad.com/wp-content/uploads/2021/08/renuka-maltistate-scaled.jpg)
यावेळी विश्वस्त सुधीर डागा, ग्रामस्थ प्रा. वसंत दहे यांनीही मनोगत व्यक्त केले. वृक्ष संवर्धनाचा वसा हाती घेऊन अशोकराव रोहमारे यांनी वृक्ष लागवडीसाठी मागील वर्षी गावाला दिलेल्या भरीव निधीच्या माध्यमातून गोदावरी नदीकाठी साकारलेल्या समृध्द वनराईची पाहणी उपस्थित मान्यवरांनी केली.
![](http://eloksanvad.com/wp-content/uploads/2020/09/expert-1.jpg)
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. एस. गायकवाड यांनी या विशेष शिबिराच्या निमित्ताने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे स्वरुप नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय दवंगे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व ग्रामस्थ उपस्थित होते.
![](http://eloksanvad.com/wp-content/uploads/2020/07/contact-for-advt.jpg)