कोपरगांव प्रतिनिधी, दि. १९ : ग्रामिण भागातील मुला मुलींनी शिकुन मोठं व्हावं, त्यांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा मिळाव्या, क्रीडा शिक्षणांत त्यांचा नांवलौकीक वाढावा आदि बाबींमध्ये ज्ञानसंवर्धनात संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे गेल्या चार दशकापासुन कार्यरत असुन त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ सदस्य छन्नुदास वैष्णव यांनी केले.

तालुक्यातील दहेगांव बोलका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुला मुलींना संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने मोफत वहयांचे वाटप करण्यांत आले त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. प्रारंभी मुख्याध्यापक बाबासाहेब लांडे यांनी प्रास्तविकात बिपीनदादा कोल्हे यांच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. निलेश त्रंबकराव सरोदे म्हणांले की, युवानेते विवेक कोल्हे यांनी तालुक्याच्या शैक्षणिक विकासासाठी सातत्यांने विविध उपक्रम राबविले आहेत.

छन्नुदास वैष्णव पुढे म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी परिसरात संजीवनी विकासाची कामधेनु उभी करत त्यातुन अनेकांचे भविष्य घडविले. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे त्यांच्याच पावलावर पाउल ठेवुन मार्गाक्रमण करून स्वतःचा वाढदिवस हारतुरे स्विकारण्यापेक्षा पर्यावरण शैक्षणिक संवर्धनासाठी स्वतः पुढाकार घेवुन काम करीत आहेत, ग्रामिण भागातील गरीब, होतकरू, हुशार, दीन दलित, उपेक्षीत घटकातील मुला मुलींचे शिक्षणासाठी गेल्या २० वर्षापासुन विनामुल्य वहया वाटपाचा उपक्रम राबवित आहेत.

याप्रसंगी विकास कुलकर्णी, रामकृष्ण सावंत, दिनेश जोशी, श्रीधर देशमुख, संतोष देशमुख, मेजर देविदास गवांदे, सुनिल सरोदे, पप्पु बागल, नितीन वल्टे, भास्कर आभाळे, ग्रामपंचायत सदस्य रितेश सुभाषराव वल्टे, योगेश मंचरे, रामेश्वर देशमुख, सिध्दांत भागवत सर, स्वप्नील गाडे सर, ताई मुरलीधर माघाडे आदि उपस्थित होते. सुत्रसंचलन व आभार बाबा कदम यांनी मानले.
