सांगवी भुसारच्या स्नेहल खंडिझोडने मिळावला आयआयटीमध्ये प्रवेश

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३१ : आखिल भारतीय जेईई ॲडव्हान्स या मुख्य प्रवेश परीक्षेत ९९.९९ टक्के गुण मिळवून बी.टेक या अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी भारतातील अग्रगण्य असणाऱ्या आयआयटी मुंबई (पवई)या इन्स्टिटयूट मध्ये ग्रामीण भागातून स्नेहल वाल्मीक खंडिझोड हिने प्रवेश मिळावला आहे.

कोपरगावं तालुक्यातील सांगवी भुसार गावचे रहिवाशी प्राथमिक शिक्षक व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे कोपरगावं तालुका अध्यक्ष वाल्मिक खंडिझोड यांची कन्या कु.स्नेहल वाल्मिक खंडिझोड हिने मोठ्या जिद्द, चिकाटी, मेहनत या यशाच्या त्रिसूत्रीनुसार अभ्यास करून भारतातील अग्रगण्य अभियांत्रिकी संस्थेत प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या  संस्थेत प्रवेश मिळवून आपला ठसा उमटवला आहे.

स्नेहल हिने स्नेहल ही बालपनापासूनच हुशार व जिज्ञासू असून तिला वाचनाची आवड आहे. तिने पहिली ते बारावी पर्यंतचे शिक्षण संत जनार्धन स्वामी महर्षी मौनगिरी महाराज इंग्लिश स्कुल कोकमठाण मध्ये सीबीएससी माध्यमातून पूर्ण केले असून तिने दहावीला ९९.९९ टक्के व बारावीला देखील ९७ टक्के गुण मिळवले आहे. तिचे हे अतुलनीय यश हे ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरणार आहे.

तिच्या या यशाबद्दल आ. आशुतोष काळे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, महानंदाचे माजी अध्यक्ष राजेंद्र जाधव, गोदावरी दुध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, कृषिभूषण विजय जाधव, इ. मान्यवरांकडून अभिनंदन केले असून तिचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply