कोपरगाव प्रतिनिधी, दि. ४ : कोपरगावचे आमदार आ.आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोकमठाण येथील थोरात वस्ती लगत असलेल्या गोदाकाठ जिल्हा परिषद शाळेमध्ये आ.आशुतोष काळे मित्र मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना दफ्तर व फळांचे वाटप करण्यात आले.

कोपरगाव मतदार संघात आ. आशुतोष काळे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कोकमठाणच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी समाजाभिमुख भावना लक्षात घेऊन कोकमठाणच्या गोदावरी नदी किनारी असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता १ ली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना दफ्तर व फळांचे वाटप करून आ. आशुतोष काळेंचा वाढदिवस साजरा केला. या शाळेत बहुतांश विद्यार्थी हे आदिवासी समाजाचे असून अशा गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या उद्देशातून हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी आ.आशुतोष काळे मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, आ.आशुतोष काळे यांचा वाढदिवस साजरा करतांना तो समाजासाठी उपयुक्त ठरावा, या हेतूने आम्ही हा उपक्रम घेतला. शिक्षण हे परिवर्तनाचे साधन आहे, आणि लहान मुलांना मदत करणे म्हणजे समाजाच्या भविष्यावर गुंतवणूक करण्यासारखे आहे. विद्यार्थ्यांना दफ्तर मिळाल्यामुळे शाळेतील त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.

या उपक्रमाबद्दल पालक व शिक्षकांनी समाधान व्यक्त करत कार्यकर्त्यांचे आभार मानले. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी आ. आशुतोष काळे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.या पुढील काळात अशा सामाजिक उपक्रमांची पुनरावृत्ती करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला.

याप्रसंगी सुनील लोंढे, दीपक रोहोम, अनंत रक्ताटे, प्रसाद साबळे, विशाल जाधव, विजयराव रक्ताटे, अविनाश निकम, डॉ. आशिष डुबे, आकाश रोहोम, संभाजी देशमुख, कुणाल रोहोम, किरण कराळे, अल्लाउद्दिन सय्यद, आदिनाथ कराळे, शरद फटांगरे, राहुल टेके आदी मान्यवरांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
