शालेय विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी उपक्रम महत्त्वपूर्ण

डॉ. सुनिता पारे : टेके पाटील ट्रस्टच्यावतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १ : देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यां आरोग्याची काळजी महत्त्वाची असते. त्यातच नेत्र तपासणी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. परंतु; बऱ्याचदा ही बाब मुलांच्याही लक्षात येत नाही आणि कधीकधी पालकांकडूनही दुर्लक्ष होते. मात्र अशाही काळात वारी गावातील राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे कार्य हे सामाजिक दातृत्व जपणारे आहे.

या कार्यातून आजवर गावासह परिसरात असंख्य उपक्रम राबवलेले आहेत. त्यातूनच विद्यार्थ्यांच्या मोफत नेत्र तपासणीचा, मोफत चष्मे वाटप व व तिरळेपणाची शस्त्रक्रिया मोफत करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरातून शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. त्यामुळे ट्रस्टचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवउद्गार सोमय्या विद्यामंदिर व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुनिता पारे यांनी काढले.

     कोपरगाव तालुक्यातील राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित “मोफत मदत सेवा केंद्रा”च्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त टेके पाटील ट्रस्ट व तुलसी आय हॉस्पिटल, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने साकरवाडी येथील सोमय्या विद्या मंदिर व उच्च माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, साकरवाडी व शिरसाठ वस्ती शाळा, वारी या तीन शाळेतील जवळपास 1000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शिबिराअंतर्गत मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप व तिरळेपणाची शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात शुक्रवार (दि.29) ऑगस्ट 2025 रोजी सोमय्या विद्यामंदिर साकरवाडी येथून करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून प्राचार्य डॉ. पारे बोलत होत्या.

याप्रसंगी व्यासपीठावर ट्रस्टचे अध्यक्ष पत्रकार रोहित टेके, ह.भ.प. डॉ.सर्जेराव टेके महाराज, ह.भ.प. डॉ. विनायक टेके महाराज, संजय गडकर, संजय राऊत, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अशोक मोरे, ग्रा.पं.सदस्य योगेश झाल्टे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्वागत गीताने करण्यात आली.

प्रास्ताविक ट्रस्टचे अध्यक्ष पत्रकार रोहित म. टेके पाटील यांनी केले. याप्रसंगी ह.भ.प. डॉ.सर्जेराव टेके महाराज, ह.भ.प. डॉ. विनायक टेके महाराज, संजय गडकर, संजय राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार गणेश गायकवाड यांनी मानले. आयोजित शिबिरात डॉ. हर्षल पाठक व कैलास भड यांनी विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी केली. याप्रसंगी राजेश खटावकर, सुरज टेके, स्वप्निल टेके, आकाश निळे, अविनाश दुशिंग, विकास कुर्‍हाडे, सनी जाधव, यश मैराळ यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply